शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहरासह तालुक्यात कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटा शहरासह तालुक्यात कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरुवात केली आहे. प्रशासन आक्रमक होऊन कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे.

विटा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरत आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशीच विटा शहरात संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा शुक्रवारी खडबडून जागी झाली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नलवडे यांच्यासह पथकाने शुक्रवारी विटा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात येऊन कारवाईचा बडगा उगारला.

या पथकाने विनामास्क व विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यातील अनेकांची तातडीने सक्तीने जलद अ‍ँटिजेन चाचणी घेतली, तर काही दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त केल्या. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मुक्तसंचार करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. या पथकाने पुन्हा तेथून नागेवाडी येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी तेथेही काहीजण विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांचीही या पथकाने सक्तीने कोरोना चाचणी घेतली. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांना विटा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पथकाची कारवाई पाहून अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.

चौकट :

थेट रुग्णालयात दाखल

विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यातच चाचणी घेतली असून, त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नागेवाडी येथे होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घरी भेटी देऊन त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही मोहीम सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.