शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११४१ जणांना कोरोना; ५१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या कायम आहे. सोमवारी दिवसभरात १,१४१ जणांना कोरोनाचे निदान होतानाच जिल्ह्यातील ४० तर परजिल्ह्यातील ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या कायम आहे. सोमवारी दिवसभरात १,१४१ जणांना कोरोनाचे निदान होतानाच जिल्ह्यातील ४० तर परजिल्ह्यातील ११ अशा ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला असून, १६९ रूग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कायम असताना बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. दिवसभरात ९३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी ७० हजारांचा टप्पा पार केला.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या अकराशेच्यावर स्थिर आहे. रविवारपेक्षा सोमवारी त्यात घट झाली आहे. सोमवारी ४० जणांचा मृत्यू झाला, त्यात सांगली शहरातील ७, मिरज, कुपवाड येथील प्रत्येकी १ यासह वाळवा तालुक्यातील ८, खानापूर ६, आटपाडी, तासगाव तालुक्यात प्रत्येकी ३, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात प्रत्येकी २ तर कडेगाव, पलूस, शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सध्या उपचार घेत असलेल्या ११ हजार ५४४ रूग्णांपैकी १,९३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १,७३८ जण ऑक्सिजनवर तर १९२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २,३१२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ६५४ जणांना कोरोनाचे निदान झाले. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २,७२६ जणांच्या तपासणीतून ५६२ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

परजिल्ह्यातून उपचारासाठी सांगली जिल्ह्यात दाखल असलेल्या रूग्णांपैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

बाधितांची संख्या ७० हजारांवर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी ७० हजारांचा टप्पा पूर्ण केला. यातील ५६ हजार ६४५ जणांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ७०,३३२

उपचार घेत असलेले ११,५४४

कोरोनामुक्त झालेले ५६,६४५

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २,१४३

सोमवारी दिवसभरात

सांगली ११३

मिरज ५६

मिरज तालुका १९५

वाळवा १३२

जत १२७

कडेगाव ११४

खानापूर ९४

पलूस ७०

कवठेमहांकाळ ६९

तासगाव ६४

आटपाडी ५४

शिराळा ५३