शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भारत इरकरकडून उलटसुलट माहिती

By admin | Updated: September 12, 2016 00:05 IST

कुडणूर हत्याकांड : चार दिवस कोठडी; पोलिसांनी माहितीबाबत पाळली गोपनीयता

डफळापूर : कुडणूर (ता. जत) येथील कुटुंबातील चौघांचे हत्याकांड करण्यामागच्या कारणाबद्दलचे गूढ कायम आहे. हत्या करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या भारत कुंडलिक इरकरने तपासात धक्कादायक, पण उलटसुलट माहिती दिली असल्याने पोलिसांनी कारणाबाबत गोपनीयता बाळगली आहे. दोन मुलींसह आई व पत्नीची हत्या करून जत पोलिस ठाण्यात हजर झालेल्या भारत इरकरची रविवारी न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांच्या भीषण हत्येची छाया रविवारी दुसऱ्या दिवशीही कुडणूर गावात दिसत होती. शेतजमिनीच्या वादात न्यायालयाने पकड वॉरंट बजाविल्यानंतर फरार असलेल्या भारत कुंडलिक इरकर याने शनिवारी आई, पत्नी व दोन मुलींची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. या भीषण हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात जमिनीची विक्री करण्यास आई व पत्नीने विरोध केल्याने भारतने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर जत पोलिसांत हजर झालेल्या भारतला रविवारी पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दि. १४ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारतने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली असली तरी, जबाबात तो पोलिसांना उलटसुलट माहिती देत आहे. यामुळे खुनाचे नेमके कारण काय, हा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. या घटनेने कुडणूर गाव सुन्न झाले आहे. माळकरी असलेला भारत कुटुंबाचा खून करेल, यावर ग्रामस्थांचा पहिल्यांदा विश्वास बसला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इरकर कुटुंब जगत होते. सावत्र आईच्या बाजूने जमिनीचा निकाल लागल्याने वैफल्यातून हे कृत्य केल्याचे त्याचे कुटुंबीय सांगत आहेत. दरम्यान, भारत याची आई मृत सुशीला इरकर, पत्नी सिंधुबाई इरकर, मुली रूपाली व राणी यांच्यावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, सोमवारी होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्याची दोन्ही मुले म्हाळाप्पा व आकाश निराधार झाली आहेत. (वार्ताहर) --------- तपासात धक्कादायक माहिती रविवारी जतचे पोलिस निरीक्षक युवराज मोहिते यांनी कुडणूरमध्ये भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, भारत हा पोलिसांसमोर वेगळीच धक्कादायक माहिती सांगत आहे. तपास कामात अडथळा होईल म्हणून पोलिस माहिती देण्यास नकार देत आहेत.