शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांनो, कामे करा, अन्यथा बिले थांबवू

By admin | Updated: January 2, 2015 00:06 IST

स्थायी समितीत निर्णय : वशिलेबाजीवरून प्रशासन धारेवर

सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील बायनेम कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबविण्याचे आदेश आज (गुरुवारी) सभापती संजय मेंढे यांनी स्थायी समिती सभेत दिले. सभेत प्रशासनालाही ठेकेदारांच्या बिलावरून धारेवर धरण्यात आले. अधिकाऱ्यांकडून तोंड बघून, वशिलेबाजीवर काही मोजक्याच ठेकेदारांची बिले अदा केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दोन वर्षापासून बायनेमची कोट्यवधीची कामे प्रलंबित आहेत. यावर आज स्थायी सभेत वादळी चर्चा झाली. बायनेम कामांच्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या आहेत. ठेकेदार कामास टाळाटाळ करीत आहे. ही कामे मंजूर असल्याने इतर निधीतून करण्यास प्रशासन मान्यता देत नाही. दुसरीकडे शासकीय निधीतील कामे मात्र ठेकेदारांकडून केली जात आहेत, असा मुद्दा नगरसेवक सुरेश आवटी, अनारकली कुरणे यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती मेंढे यांनी, बायनेमची कामे पूर्ण झाल्याशिवाय या ठेकेदारांची इतर कामांची बिले अदा करू नयेत, असे आदेश प्रशासनाला दिले. सभेत ठेकेदारांच्या बिलाचा विषयही गाजला. अधिकाऱ्यांकडून मर्जीतील ठेकेदारांची बिले वेळेवर काढली जात आहेत, तर इतर ठेकेदारांची बिले येऊनही महिनोन् महिने ती दिली जात नाहीत. वशिलेबाजी व तोंडे बघून बिले काढली जात असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. सभापती मेंढे यांनी ठेकेदारांना, थोड्या प्रमाणात बिले काढावीत, कोणतीही वशिलेबाजी खपवून घेणार नाही, असा दमही भरला. सभेत दिवाबत्ती साहित्य, पाईप खरेदी व पाईपलाईन खुदाईच्या ठेक्याला मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सांगलीवाडीतील शाळा बांधकामावर पुन्हा सभेत चर्चा झाली. नगरसेवक दिलीप पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. प्रशासनाने शाळेचे काम सुरू केल्याचे स्पष्ट केले. दिलीप पाटील यांनी, सभेत चर्चा होऊ नये यासाठी कालपासून काम सुरू केले आहे, सभा झाल्यानंतर पुन्हा काम बंद होण्याची भीती व्यक्त केली. सभापती मेंढे, नगरसेवक हारुण शिकलगार या दोघांनी दोन दिवसांनंतर बांधकामाची पाहणी करावी, काम सुरळीतपणे सुरू नसल्यास संबंधित मुख्याध्यापकावर फौजदारी करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)विनातरतूद शिफारसगॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर पाईपलाईन बदलण्याचा विषय प्रशासनाने सभेत आणला होता. पण या कामाला नगरोत्थान योजनेमध्ये आर्थिक तरतूद नसल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तरतूद असलेल्या कामावर आयुक्त सह्या करीत नाहीत; विनातरतूद कामे मात्र मंजुरीसाठी ‘स्थायी’कडे पाठविली जातात, असा आक्षेपही घेतला.