शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

ठेकेदाराला काळ्या यादीत काढणार

By admin | Updated: January 1, 2015 00:06 IST

विकासकामे खोळंबली : आयुक्तांकडून हिरवा कंदील; स्थायीत चर्चा शक्य

सांगली : महापालिकेला प्राप्त झालेल्या शासकीय निधीतून विकासकामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बड्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. आयुक्त अजिज कारचे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला असून उद्या, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेला गेल्या वर्षी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने विकास कामांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून विविध कामे प्रस्तावित करण्यात आली. महापालिका प्रशासनाने त्यासाठी जाहीर निविदाही प्रसिद्ध केल्या. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने रस्त्यांच्या डांबरीकरणासह विविध कामे मार्गी लागावीत, यासाठी प्रयत्न चालविले होते. पण त्याला यश आले नाही. पालिकेतील अधिकारी-ठेकेदारातील संघर्षामुळे काही कामे अद्यापही खोळंबली आहेत. माजी मंत्री मदन पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत २० कोटीचा निधी आणला. या निधीतील सव्वा कोटीची कामे एकाच ठेकेदाराने घेतली आहेत. त्यात सांगलीवाडीसह मिरज शहरातील कामांचा समावेश आहे. ही कामे सुरू करण्यासाठी त्या प्रभागातील नगरसेवक दिलीप पाटील, बसवेश्वर सातपुते यांच्यासह सत्ताधारी गट प्रयत्नशील होता. पण ठेकेदाराने सात महिने झाले तरी अद्याप या कामांना सुरूवात केलेली नाही. वारंवार ठेकेदार, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही कामे झालेली नाहीत. याबाबत मदन पाटील यांच्याकडे नगरसेवकांनी तक्रार केली होती. खुद्द मदनभाऊंनी दूरध्वनीवरून ठेकेदाराशी संपर्क साधून कामे सुरू करण्याचे आदेश दिले. पण त्यालाही ठेकेदाराने कोलदांडा दिला. या प्रकारामुळे गेल्या काही दिवसापासून ठेकेदाराविरोधात नाराजी वाढली होती. आज नगरसेवक दिलीप पाटील व अन्य सदस्यांनी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराविरोधात तातडीने प्रस्ताव मागविला. या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. आता हा प्रस्ताव स्थायी समितीकडे चर्चेसाठी जाणार आहे. उद्या स्थायीच्या सभेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वाद नेमका कोणाशी?संबंधित ठेकेदाराने कामास टाळाटाळ केल्याने त्याच्यावर कारवाईसाठी नगरसेवक आग्रही आहेत. वस्तुत: या ठेकेदाराचा वाद नेमका कोणाशी आहे, याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. अधिकाऱ्यांशी वाद असल्याने ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचे सदस्यांचे मत आहे. ठेकेदार- अधिकाऱ्यांचा संघर्ष कधी मिटणार? असा सवालही उपस्थित होत आहे.