शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत काँग्रेसचा ठराव : जयंत पाटील यांच्यावर नेत्यांचे टीकास्त्र

By admin | Updated: June 11, 2016 01:27 IST

मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

मिरज : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर लढविण्याचा ठराव मिरजेत झालेल्या काँगे्रसच्या तालुका मेळाव्यात करण्यात आला. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, गटा-तटाचे राजकारण करू नये, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याबाहेरील नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले. मिरजेत राजपूत हॉलमध्ये तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शैलजा पाटील उपस्थित होते. प्रतीक पाटील म्हणाले की, वसंतदादांचा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याच्या नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. परंतु काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजप शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्यामुळे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळले आहेत.मोहनराव कदम म्हणाले की, काँग्रेस भांडणारा नव्हे, संस्कार असलेला हा पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यातील गटबाजी संपवावी. तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. पंचायत समिती सभापती जयश्री पाटील, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, दिलीप बुरसे, सुभाष पाटील, सदाशिव खाडे, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतराव गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)