शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापौर कांबळे यांना हटविण्यासाठी काँग्रेसच सरसावली!

By admin | Updated: November 2, 2015 23:57 IST

जयश्रीतार्इंना साकडे

सांगली : महापौर विवेक कांबळे यांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील एका गटाने कंबर कसली आहे. महापालिकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सोमवारी कांबळे यांना महापौर पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली; पण कांबळे यांनी त्यावर विचार करू, असे उत्तर देत राजीनाम्याला बगल दिली. दरम्यान, काही नगरसेवकांनी जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन महापौर हटावसाठी साकडे घातले. महापौरपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा सांगलीतून कांचन कांबळे यांना महापौर पदाची संधी देण्यात आली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची निवड केली होती. त्यांनी सतरा महिने महापौर पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी महिन्यात नव्या महापौरांची निवड होऊन विवेक कांबळे यांनी पदभार स्वीकारला. कांबळे यांच्या निवडीवेळीच सत्ताधारी गटातून त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला होता. त्याचवेळी उर्वरित सव्वावर्षात दोन ते तीन महापौर होतील, असे सांगितले जात होते. आता दहा महिने झाले असून, अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. येत्या फेब्रुवारीत नव्या महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांसाठी अन्य नगरसेवकांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून सुरू झाली आहे. मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. विद्यमान महापौरांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी कंबर कसली आहे. सोमवारी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्यानंतर एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने महापौर दालनात कांबळे यांची भेट घेतली. मदन पाटील यांनी कांबळे यांचा राजीनामा घेण्यास सांगितले होते. त्यांच्या इच्छेनुसार राजीनामा द्यावा, असे सांगितले.कांबळे यांनी, मदनभाऊंनी राजीनाम्याचा विषय कोणासमोर काढला होता, कोणकोणत्या नगरसेवकांना त्यांनी निरोप दिला होता, असे उलट प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मदनभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या गटाची सूत्रे त्यांच्या पत्नी जयश्रीताईंकडे आहेत. सोमवारी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी जयश्रीताई यांनाही महापौरांचा राजीनामा घेण्याचे साकडे घातले. यासंदर्भात नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)शह-काटशह आणि माघारीचे राजकारणमहापौर विवेक कांबळे यांनी पदभार घेतल्यापासून गेल्या दहा महिन्यांत अनेक वादविवाद झाले. महासभेत अनेकदा महापौरांना आपलाच निर्णय मागे घेण्याची वेळ आली. पाणी खासगीकरण, वित्त आयोगाचा निधी यांसह अनेक विषय त्यांनी रद्द केले. सभागृहातही त्यांना काँग्रेसच्या गटाची फारशी साथ मिळालेली नाही. मध्यंतरी महापौर कांबळे व स्थायी समितीचे सभापती संजय मेंढे यांच्यात उघड संघर्ष झाला होता. प्रत्येकवेळी महासभेतील ऐनवेळचे ठराव हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पालिकेतील पडद्यामागील शह-काटशहामुळेच त्यांची कारकीर्द गाजत आहे.