शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकांची २१ ला बैठक

By admin | Updated: January 13, 2016 23:28 IST

महापौर निवड : पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील यांची उपस्थिती

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांची विस्कटलेली घडी आणि महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ रोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला आमदार पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. तत्कालीन सांगली नगरपालिका व आताच्या महापालिकेवर मदन पाटील यांचे वर्चस्व होते. त्यांचा शब्द महापालिकेत अंतिम मानला जात होता. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, तसेच प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात मदनभाऊंचा सहभाग असे. गतवेळी महापालिकेची निवडणूक काँग्रेसच्या झेंड्याखाली झाली. मदनभाऊ, पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनी एकत्रित निवडणूक लढवित सत्ता खेचून आणली होती. सत्तेत कदम पिता-पुत्रांचा मोलाचा वाटा असला तरी, त्यांनी कधी पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मदनभाऊंकडे होते. पण आता मदनभाऊंच्या निधनानंतर पालिकेतील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. कधीकाळी एकसंध वाटणाऱ्या काँग्रेसला दुफळीचे ग्रहण लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापौर निवडीसाठी आतापासून गटा-तटाचे राजकारण खेळले जात आहे. नेताच नसल्याने सत्ताधारी गट सैरभैर झाला आहे. तरीही मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसमधील छुपा संघर्ष, नगरसेवकांच्या वाढलेल्या अपेक्षा, पदाधिकाऱ्यांबद्दल असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकसंध ठेवण्यासाठी पतंगराव कदम, विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील यांनी २१ जानेवारी रोजी नगरसेवकांची बैठक बोलाविली आहे. ही बैठक नेमकी कोठे होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण बैठक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी महापौर निवडीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी) जेवणावळी सुरू महापौर पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ज्येष्ठ नगरसेवकांसह पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनाही महापौर पदाचे डोहाळे लागले आहेत. बुधवारी कुपवाडमधील एका नगरसेवकाने जेवणाचा बेत आखला होता. या जेवणाला अनेक नगरसेवकांनी हजेरी लावली होती. भोजनावळींना आतापासूनच सुरुवात झाली आहे.