शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळे काँग्रेसला फटका

By admin | Updated: October 23, 2014 00:05 IST

विधानसभा निवडणूक : महापालिका निवडणुकीपेक्षा कमी मते

सांगली : पक्षांतर्गत गटबाजी, बंडखोरीचे लागलेले ग्रहण आणि छुप्या कुरघोड्यांनी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली एकूण मते व त्यांची टक्केवारी पाहता, विधानसभा निवडणुकीत यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पक्षांतर्गत गटबाजीने डोके वर काढले होते. दिगंबर जाधव यांनी बंडखोरीचे संकेत दिले. त्यानंतर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनीही बंडखोरी केली. उघडपणे बंडखोरीचा झेंडा एकीकडे फडकविला जात असतानाच, पक्षांतर्गत एकत्र दिसणाऱ्या नेत्यांमधील सूर जुळत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. महापालिका निवडणुकीत कदम व दादा घराण्याने एकसंधपणे ताकद लावल्यामुळे जयंत पाटील यांच्या हातून महापालिकेची सत्ता पुन्हा काँग्रेसने काबीज केली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा बंडखोरी आणि नेत्यांमधील एकसंधपणाची उणीव दिसून आली. मोदी लाटेचा फटका काँग्रेसला बसतानाच अन्य कारणांमुळेही पक्षाची पीछेहाट झाली. यामध्ये राष्ट्रवादीने केलेला विरोधी प्रचार, पक्षांतर्गत संघर्ष या गोष्टींचा समावेश होता.विधानसभा निवडणुकीत पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकच एकसंधपणे लढत होते. पक्षापेक्षा मदन पाटील समर्थकांचे अस्तित्व ठळकपणे दिसत होते. बंडखोरीला तोंड देत या समर्थकांनी एकहाती किल्ला लढविला. बंडखोरांमुळे मोठी मतविभागणी होईल, ही शंका त्यांनी खोटी ठरवली. बंडखोरांना कमी मते मिळाली असली तरी, पक्ष आणि पक्षाचे नेते म्हणून काम करणाऱ्यांमध्ये कुठेही सुसूत्रता दिसून आली नाही. ऐन विधानसभा निवडणुकीतच माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पतंगराव कदम यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उमेदवारी निश्चित करण्यावरून तसेच रणनीती ठरविण्यावरून नेत्यांचे सूर बिघडले होते, हे यावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच विजयासाठी आवश्यक असलेली फिगर गाठणे काँग्रेसला शक्य झाले नाही. सांगली शहरापेक्षा मिरजेत काँग्रेसअंतर्गत गोंधळ मोठा होता. याठिकाणचे अनेक नगरसेवक सांगलीकरांच्या प्रचारासाठी धडपडत होते. पक्षाच्या उमेदवाराकडील यंत्रणा कमी पडत होती. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर गेला असला तरी, याठिकाणी यश मिळविणे काँग्रेसला अवघड नव्हते. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच अधिकृत उमेदवारांना फटका बसल्याचे स्पष्टपणे आता दिसून येत आहे. काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे व गटबाजीचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला विरोधी उमेदवारांपेक्षा स्वकीयांपासूनच अधिक धोका वाटत आला आहे. त्यामुळे उमेदवारांची बरीचशी शक्ती या गोष्टी रोखण्यासाठीच खर्ची पडत आहे. त्याचा फटका प्रत्येकवेळी उमेदवारांना बसत आहे. (प्रतिनिधी)मदन पाटील यांच्याकडून ६६ हजारांची हॅट्ट्रिकमदन पाटील यांना गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतांची बेरीज ६६ हजारांच्याच घरात आहेत. २00४ मध्ये जेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांना ६६ हजार ५६३ मते मिळाली होती. २00९ मध्ये ते पराभूत झाले त्यावेळीही त्यांना ६६ हजार २४0 मते मिळाली होती. या निवडणुकीतही त्यांना ६६ हजार ४0 मते मिळाली आहेत. म्हणजेच मदन पाटील यांना प्रत्येकवेळी ६६ हजार मते मिळाली आहेत. त्यांच्या मतात काहीच फरक पडला नाही. नव्याने मतदार खेचण्यात ते कमी पडले असावेत, असाही एक तर्क आता लढविला जात आहे. एकूण मतांच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर, सांगलीतून र्कांग्रेसला महापालिका निवडणुकीत ३८.५0 टक्के मतदान झाले होते, तर सांगली विधानसभा मतदारसंघातून ३४ टक्केच मते मदन पाटील यांना पडली. मिरजेतील महापालिकेच्या निवडणुकीतील टक्केवारी आणि विधानसभेची टक्केवारी यात मोठी तफावत आहे.