शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘सांगली व्यापार बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

एलबीटीचा तिढा : कर न भरण्याचा पुनरूच्चार; कृती समितीने दिला बेमुदत बंदचा इशारा

सांगली : एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने बँक खाती गोठविण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी आज व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या ‘सांगली बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एलबीटीविरोधात कृती समितीने शहरात मोटारसायकल रॅली काढून दुकानाच्या प्रतिकात्मक चाव्या महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केल्या. महापालिकेचे नेते व लोकप्रतिनिधीकडून याप्रश्नी तोडगा काढेपर्यंत कर न भरण्याचा पुनरुच्चारही व्यापाऱ्यांनी केला. दीड वर्षाच्या खंडानंतर महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी एलबीटी वसुलीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. गेल्याच आठवड्यात ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती गोठविण्यात आली, तर आणखी १०० व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याची तयारी सुरू केली आहे. एलबीटी लागू झाल्यापासून सांगलीतील व्यापारी संघटनांनी असहकार आंदोलन हाती घेत कराचा भरणा केलेला नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. आयुक्तांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज एलबीटीविरोधी कृती समितीने सांगली बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगलीतील कापड पेठ व सराफ कट्टा या दोन मोठ्या बाजारपेठा सोमवारी बंदच असतात. उर्वरित गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रस्ता या भागातील दुकाने सकाळी बंद होती. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, सुदर्शन माने, मुकेश चावला यांच्या नेतृत्वाखाली गणपती मंदिरापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून महापालिकेच्या मुख्यालयासमोर रॅलीची सांगता झाली. यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त कारचे यांची भेट घेऊन चर्चा केली. पण ही शिष्टाईही आयुक्तांनी फेटाळून लावत एलबीटी वसुलीत माघार घेणार नाही, असेही स्पष्टपणे सुनावले. यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी समीर शहा यांनी कोणत्याही स्थितीत एलबीटी भरणार नसून, महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर दडपशाही सुरू आहे. गणेशोत्सवानंतर बेमुदत सांगली बंदचा इशाराही त्यांनी दिला. नगरसेवक गौतम पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचे सांगितले. दुपारी दोननंतर काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू केले होते. गणपती पेठ व परिसरातील दुकाने बऱ्यापैकी उघडली होती. मार्केट यार्डातही बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. यार्डातील मोजकी दुकाने सोडता सर्वत्र व्यवहार सुरळीत होते. सायंकाळनंतर शहरातील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले होते.सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील या आंदोलनामुळे जवळपास ३ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होती. एकीकडे व्यापाऱ्यांचे आंदोलन आणि दुसरीकडे महापालिकेची वसुली सुरू होती. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे गेल्या चार दिवसात अडीच कोटीहून अधिक एलबीटी वसुली झाली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)