शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

डफळापूर पेयजलची कामे प्राधान्याने पूर्ण करा : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

जत : डफळापूर (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून अल्पावधीत या योजनेतून पाणी सोडून चाचणी ...

जत : डफळापूर (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून अल्पावधीत या योजनेतून पाणी सोडून चाचणी घेण्यात येईल. वीज वितरण कंपनी व वाडी वस्तीवरील पाइपलाइनचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून घ्यावे, अशी सूचना राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली.

डफळापूर येथील पाणी योजनेची पाहणी करण्यासाठी आले असताना कदम बोलत होते.

डफळापूर शहराची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार गृहीत धरून २०११ मध्ये डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेला शासनाकडून मान्यता मिळाली. सात कोटी ५० लाख रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या योजनेचे काम २०११ मध्ये सुरू झाले. माजी सभापती सुनील चव्हाण यांच्या निधनानंतर या योजनेचे काम रखडले. परंतु दिग्विजय चव्हाण पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर या योजनेच्या कामाला गती आली आहे. बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील साठवण तलावात जॅकवेल बसवून डफळापूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डफळापूर ते बाज रस्त्यावरील एकवीरा देवीच्या मंदिराजवळ जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणून तेथून डफळापूर शहर व वाडी-वस्तीवर देण्यात येणार आहे.

पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून वाडी-वस्तीवरील पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. सध्या महावितरणकडून विद्युत जनित्र बसवून वीजपुरवठा करण्याचे काम बाकी आहे. हे काम त्वरित पूर्ण करून द्यावे, अशी सूचना कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. वीज जोडणी झाल्यानंतर डफळापूर गावात पाणीपुरवठा करण्यात अडचण येणार नाही. वाडी-वस्तीवरील काम अद्याप अपूर्ण आहे. ते त्वरित पूर्ण करा, अशी सूचना कदम यांनी पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांना केली.

या वेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, तांत्रिक सल्लागार के.डी. मुल्ला, ॲड. युवराज निकम, आप्पाराया बिराजदार उपस्थित होते.