शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भत्त्यावरील डल्लाप्रकरणी संघटनेची तक्रार

By admin | Updated: January 28, 2015 00:54 IST

प्रकाराबाबत संताप : मानधन कापणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सांगली : पोलिओ लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्या ‘आशा’ वर्कर्सनी मेहनत घेतली, त्यांच्याच मानधनाला कात्री लावत त्यावर डल्ला मारण्याचा प्रकार नुकताच घडला. याविषयी सांगली जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भत्ता व मानधनाबाबत झालेल्या या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशभर शून्य ते पाच या वयोगटातील मुलांना पोलिओ लस देण्याची मोहीम सुरू आहे. १८ जानेवारीस सांगली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम राबविण्यासाठी जिल्हाभर ‘आशा’ कर्मचारी, नर्सिंगचे विद्यार्थी व इतर मुलांनी प्रयत्न केले. त्यांनी मोठ्या उत्साहाने ही मोहीम राबविली. मोहिमेसाठी प्रत्येक नियुक्त कर्मचाऱ्यास ७५ रुपये मानधन व प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस घेऊन जाण्यासाठी २0 रुपये द्यावेत, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातही अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी ‘एनयुएचएम’ (नॅशनल अर्बन हेल्थ मिशन)अंतर्गत आशा कर्मचाऱ्यांनी काम केले. या सर्व कर्मचाऱ्यांना दिवसाला ७५ रुपये मानधन व २0 रुपये प्रवास भत्ता देणे अपेक्षित होते. मात्र प्रवास भत्ता न देता केवळ मानधन देण्याचा प्रयत्न झाला. भत्ता न देण्याचे समाधानकारक उत्तर पालिका प्रशासनाने दिले नाही. पोलिओ लस आरोग्य केंद्रातून घेऊन जाण्याचे २0 रुपये दिले जातात. सर्व कर्मचारी ही लस आरोग्य केंद्रातून घेऊन जातात. त्याबाबतची व्हाऊचरही बनविण्यात आली आहेत. असे असताना हे २0 रुपये जातात कोठे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. संघटनेच्या अध्यक्षा मीना कोळी, सचिव उमेश देशमुख, वर्षा ढोबळे यांनी निवेदन दिले. (प्रतिनिधी)