शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या निवडणुकीत पालिकेसाठी रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या रणांगणातून तिन्ही पॅनलमधून तिन्ही गटांचे वेगवेगळे उमेदवार आमने-सामने आहेत. इस्लामपूर पालिका सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या रणांगणातून तिन्ही पॅनलमधून तिन्ही गटांचे वेगवेगळे उमेदवार आमने-सामने आहेत. इस्लामपूर पालिका सहा महिन्यांवर आली आहे. कृष्णाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांच्या घरातील उमेदवार आहेत. त्यामुळे कृष्णा निवडणूक इस्लामपूर मर्यादित पालिकेची रंगीत तालीम ठरेल. गटाची ताकदही दिसेल.

पालिकेच्या राजकारणात उरूण परिसरातील नेत्याचे वर्चस्व आहे. या परिसरातच ८०० सभासद आहेत. सत्ताधारी सहकार पॅनलचे उमेदवार संजय पाटील हे उरूण परिसरातील आहेत. त्यांच्या घरात तीस वर्षांहून अधिक काळ पालिकेच्या राजकारणाचा वारसा आहे. सध्या त्यांचे बंधू शहाजी पाटील राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे संजय पाटील चुलत बंधू आहेत. पालिकेत विजयभाऊ पाटील यांचा भक्कम गट होता. त्यांच्या निधनानंतर या गटाची जबाबदारी शहाजीबापू पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे यावेळी ते सहकार पॅनलकडे आपल्या गटाची ताकद आजमावत आहेत.

रयत पॅनलकडून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे उमेदवार आहेत. सध्या ते विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्या घरात पालिकेचा राजकीय वारसा आहे. शहरातील राजकारणात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे ते समर्थक आहेत. पालिकेत डांगे गटाचे अस्तित्व आहे. त्याचे नेतृत्व ॲड. चिमण डांगे करतात. विजयभाऊ गट आणि डांगे गट यांचे सख्य पाहता या दोन्ही गटांची ताकद दिसणार आहे.

आगामी पालिका निवडणुकीतही या दोन्ही घरांतील राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित आहे. यामुळे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत इस्लामपुरात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संस्थापक पॅनलमधून माजी नगरसेवक शिवाजी पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार यांना विजयभाऊ पाटील यांच्या शिफारसीने स्वीकृत नगरसेवकपद राष्ट्रवादीने दिले तेव्हा हा वादाचा मुद्दा झाला. शिवाजी पवार यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला. पालिकेत विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पवार यांनी विकास आघाडीशी जवळीक साधली आहे. सहकार आणि रयत पॅनलने जयंत पाटील समर्थकांना उमेदवारी दिली, तर संस्थापक पॅनलने राष्ट्रवादीविरोधी शिवाजी पवार यांना उमेदवारी देऊन खेळी केली आहे. पवार यांच्या पाठीशी पालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार आहेत.

उरूण परिसरात सभासदाची संख्या ८०० च्या आसपास आहे. या परिसरात उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पालिकेतील पक्षप्रदोत विक्रमभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष बी.ए. पाटील, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार, आजी-माजी नगरसेविकांची संख्या मोठी आहे. पाटील, पवार, जाधव यांचा भाऊपणा आहे, तसेच विविध गटांत सभासद आहेत. त्यामुळे इस्लामपुरातील तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

चौकट

तिन्ही गट जोमात

शिवाजी पवार यांना सत्ताधारी विकास आघाडीतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळेलच; पण त्यासोबत महाडिक गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सहकार पॅनलने जयंत पाटील समर्थकांना उमेदवारी दिली आहे, तर रयत पॅनलने डांगे गटाचे आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी देऊन सहकाराला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इस्लामपुरातील कृष्णाची निवडणूक तिन्ही गटांत विभागली आहे.