शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजार समितीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:24 IST

फोटो : आमदार सुमनताई पाटील, खासदार संजयकाका पाटील दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू ...

फोटो : आमदार सुमनताई पाटील, खासदार संजयकाका पाटील

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानिमित्ताने वातावरण ढवळून निघत असतानाच, या निवडणुकीकडे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी वर्चस्वासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल २७ ऑगस्टला पूर्ण झाला आहे. मात्र कोरोनो महामारीमुळे राज्य शासनाकडून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. विद्यमान संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पाच वर्षापूर्वी झालेली निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात आमदार सुमनताईंच्या नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक बाजार समितीची होत होती. भाजप आणि राष्ट्रवादीकडून सर्वस्व पणाला लावण्यात आले होते. मतदानादिवशी झालेल्या हाणामारीमुळे राज्यभर ही निवडणूक चर्चेत आली होती. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली.

सत्तेत आल्यानंतर बाजार समितीतील राष्ट्रवादीचा कारभार सुुंदोपसुंदीचा आणि वादग्रस्त राहिला आहे. या कारभाराची सातत्याने चर्चा होत असतानाच, आता निवडणूक चर्चेत आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघत आहे. तालुक्यातील ३९ गावांतील निवडणूक होत असली तरी, गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचे वेध लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी ग्रामपंचायतीच्या रिंगणात उतरून बाजार समितीचा मार्ग सुकर करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

चौकट :

बाजार समितीच्या बिनविरोधची चर्चा

गतवेळची बाजार समितीची निवडणूक खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र पाच वर्षांत दोन्ही नेत्यांतील बदललेली समीकरणे आणि ‘अंडरस्टॅन्डिंग’च्या चर्चेमुळे यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांकडून बिनविरोधचेच प्रयत्न राहणार असल्याची चर्चा आहे.