शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील राष्ट्रवादीत आता सामूहिक नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मौन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे. हे नेतृत्व तीन प्रमुख नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. शिवाय दोन-तीन जणांची सल्लागारपदी निवड होईल. मात्र, पाटील यांचे पुत्र प्रतीक त्यावर नियंत्रण ठेवतील, असे संकेत आहेत.

गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा निसटता पराभव जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. शहराचे नेतृत्व अ‍ॅड. चिमण डांगे यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती लांबणीवर पडली आहे. दरम्यान, डांगे यांची धनगर समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आगामी काळात शहरातील एकाकडे नेतृत्व न देता ते गटनेते संजय कोरे, अ‍ॅड. चिमण डांगे आणि शहाजीबापू पाटील यांच्याकडे एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. सल्लागार म्हणून राजारामबापू सहकारी बॅँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष बी. ए. पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या सर्वांकडे पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात येण्याचे संकेत आहेत. युवा नेते प्रतीक पाटील हे सगळ्यावर नियंत्रण ठेवतील.

महाआघाडीत सत्ता आल्यानंतरच जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी शहरात प्रभागनिहाय बैठका घेऊन नागरिकांशी थेट संपर्क साधला आहे. या दाैऱ्यात प्रतीक पाटील यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली होती.

चौकट

एनए परिवारांत मनोमीलनाचे प्रयत्न

येथील एनए परिवारातील दुफळी महत्त्वाची घटना मानली जाते. ‘एनए’चे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आणि नगरसेवक खंडेराव जाधव यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. याची जबाबदारी संजय कोरे आणि शहाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

फोटो- १८०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर पालिका न्यूज (चार सिंगल फोटो)

प्रतीक पाटील, संजय कोरे, अ‍ॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील

पालिका लोगो