शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कोकरुडची पाणी योजना आठ वर्षांपासून बंद...

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

ग्रामपंचायत उदासीन : लाखो रुपये पाण्यात

संजय घोडे-पाटील -कोकरुड (ता. शिराळा) येथे भारत निर्माण योजनेतून सुमारे १६ लाख रुपये खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना आठ वर्षांपासून सुरू होण्याआधीच बंद अवस्थेत आहे. याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शासनाचे लाखो रुपये अक्षरश: पाण्यात गेले आहेत.येथील गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गवळोबा रस्त्यानजीक कचऱ्याचा मोठा ढीग साठला आहे व बाजूलाच स्वच्छतागृह नसल्याने एका पडक्या भिंतीच्या बाजूचा परिसर गलिच्छ केला आहे. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत असून, ही हद्द माळेवाडी-कोकरुड यामध्ये येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतींचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. गावाला स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने येथील जि. प. शाळेपाठीमागे उभी केलेली पाण्याची टाकी उभारतानाच कलली होती. शेजारील फिल्टर टँक गंजून गेला आहे. नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत येणारी पाईपलाईनही अपुऱ्या अवस्थेत आहे. तरीही शासनाचा या कामामधील लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी संगनमताने लाटला आहे. ही योजना अपुरी असतानाही ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतलीच कशी? तिला काम पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट (अहवाल) कोणी दिला? त्याचे बिल मंजूर झालेच कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.गावाला शासनाच्या विविध निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये मिळाले आहेत. त्यामधून चार/चार पाणी योजना असतानाही पिण्यासाठी पुरसे पाणी उपलब्ध नाही. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संगनमताने शासनाचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदारांच्या घशात घातला आहे. चार वर्षापूर्वी संजय शिवाजी घोडे (मायकल) या तरुणाने शोले स्टाईलने या पाण्याच्या टाकीवर चढून अभिनव आंदोलन केले होते. राजकीय कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.गावातील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाची दुरवस्था झाल्यामुळे परिसरातून येणारी मंडळी, प्रवासी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय व जनावरांच्या दवाखान्याच्या भिंतीचा आधार घेऊन दुरुपयोग करीत आहेत. बसस्थानक परिसर व कोकरुड-मलकापूर रस्त्यावर त्याची दुर्गंधी पसरलेली असते. तळे परिसर, चौगुले कॉर्नर, नांगरवाडा, खंदक, हरिजन वस्ती आदी ठिकाणी अशीच स्थिती आहे.विकास कामात लाखोंचा भ्रष्टाचारग्रामपंचायतीने शासनाच्या पर्यटन निधीतून काँक्रिटीकरण, नाले व पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत. मात्र अनेक गल्लीतील कामे अपूर्ण आहेत. जलशुध्दीकरण योजना मंजूर होऊन पूर्ण झाली, त्यावेळी वेगळे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी असल्याने याबाबत झालेल्या घडामोडींची आपल्याला काहीही कल्पना नाही. कोकरुड गावात झालेल्या अनेक विकास कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांंचा आरोप आहे.