शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचा नारळ फोडून नेते, अधिकारी झाले गायब; सांगली-तुंग रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला ...

सांगली : श्रेयवादाचा लाडू चाखत भाजपच्या नेत्यांनी सांगली-तुंग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी केला. नारळ फोडून नेते गायब झाले आणि अधिकारीही फिरकले नसल्याने, या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे. परिसरातील नागरिक, प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्या नागरिक जागृती मंचने, नेते गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला आहे.‘लोकमत’ने याप्रश्नी आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला.उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रुप धारण करून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. तत्परतेने उद्घाटनांचा कार्यक्रम होत असताना, तितक्याच तत्परतेने कामे का सुरू होत नाहीत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले. पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आयोजित केला.राजकीय आरोप-प्रत्यारोप करून सर्व औपचारिकता पार पाडण्यात आली. निधी आणण्यासाठी कोणी किती कष्ट घेतले, याची कथाही सांगण्यात आली. पण या सर्व गोष्टी पोकळ ठरल्या.सर्व नेते गेले कुठे? : सतीश साखळकरनागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, थाटात उद्घाटन करणारे, सेल्फी घेऊन नंतर त्याचे श्रेय लाटणारे सारे नेते आता गेले कुठे? राजकारण करण्यासाठी कामे न करता उत्तरदायीत्व म्हणून काम करायला राजकारण्यांनी शिकावे. लोकांचे हाल काय होतात, याची कल्पना नेत्यांना नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. कोणी निधी आणल्याचा गाजावाजा करीत आहे, तर कुणी सेल्फीचा परिणाम झाल्याचे सांगत आहे. या गोष्टी या नेत्यांना अगोदर का सुचल्या नाहीत? लोकांना फसविण्याचे उद्योग आता बंद करावेत.