शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संस्था, विद्यालय व नागरिक यांना जोडणारा दुवा म्हणजे लिपिक : सुधाकर हसबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : संस्था, विद्यालय व नागरिक यांना जोडणारा दुवा म्हणजे लिपिक होय, असे प्रतिपादन हाय्यर एज्युकेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : संस्था, विद्यालय व नागरिक यांना जोडणारा दुवा म्हणजे लिपिक होय, असे प्रतिपादन हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस यांनी केले.

शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील वरिष्ठ लिपिक जगन्नाथ जोशी व कनिष्ठ लिपिक प्रदीप जोशी हे निवृत्त झाले, त्याबद्दल त्यांचा गौरव व निरोप समारंभ आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

हसबनीस म्हणाले, लिपिक म्हणून त्यांनी आपले काम आदर्शवतच केले. कार्यालयीन कामकाजामध्ये या दोघांचाही हातखंडा होता. शाळेचा नावलौकिक वाढावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

दरम्यान, शिक्षक दिनाचे औचित्य साधून आजपर्यंत विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक विसाजी हसबनीस, प्रदीप जोशी, जगन्नाथ जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ संचालक बाबूराव पवार, रमेश हसबनीस, रघुनाथ बुकशेटे, विद्द्या हसबनीस, संस्थेचे सहकार्यवाह प्रकाश नवांगुळ, सुनील नांद्रे, वसंत पाटील, मकरंद जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्याध्यापक अंगराज माजगावकर यांनी स्वागत केले. प्रशांत मोहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुक्ते यांनी केले.