शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

देवराज पाटील, बर्डे, लिंबाजी पाटील यांचा दावा

By admin | Updated: June 14, 2016 00:21 IST

दिग्गजांची मोर्चेबांधणी : जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित

कासेगाव : आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुक उत्साहित झाले आहेत. कासेगाव जि. प. गटातून माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, तर नेर्ले जि. प. गटातून माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांची अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदारी मानली जात आहे. परंतु निवडणूक लढविताना मतदार संघात कोणते आरक्षण पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यामुळे देवराज पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यांच्यामुळेच रवींद्र बर्डे, लिंबाजी पाटील यांनाही संधी मिळाली. देवराज पाटील यांच्यारुपाने तब्बल ४0 वर्षानंतर वाळवा तालुक्याला जि. प. अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला. आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवराज पाटील यांनी जिल्ह्याचा संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्यात विक्रमी मतांनी विजय मिळवून त्यांनी आपली छाप सोडली.याच गटातील रवींद्र बर्डे यांनीही वाळवा पं. स.च्या सभापतीपदी प्रभावीपणे काम केले आहे. अनुभवी, उत्कृष्ट वक्ते व प्रशासनावर पकड असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत.नेर्ले जि. प. गटातून माजी जि. प. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हेही शर्यतीत आहेत. उपाध्यक्ष पदाच्या कार्यकालात त्यांनी त्यांच्या मतदार संघात मोठा विकास निधी खेचून आणला. सध्या ते य. मो. कृष्णा साखर कारखान्यावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.एकंदरीत राष्ट्रवादीचे हे तीन शिलेदार आगामी जि. प. अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहेत. आमदार जयंत पाटील कोणाला संधी देणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. सध्या तरी या तीन दिग्गज नेत्यांचे लक्ष मतदार संघाच्या आरक्षणाकडे लागले आहे. (वार्ताहर)जयंतरावांकडे लक्षमाजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, सभापती रवींद्र बर्डे यांचा जि. प. मतदारसंघ एकच आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील कोणाला संधी देणार? याची चर्चा सुरु आहे. जर या मतदार संघातील आरक्षण वेगळे पडले, तर देवराज पाटील, रवींद्र बर्डे वेगळा मतदारसंघ निवडणार का? याबाबतही तर्क—वितर्क लढवले जात आहेत.