शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लरच्या आमिषाने साडेआठ हजाराला गंडा

By admin | Updated: October 26, 2014 00:01 IST

जतमधील घटना : व्यापाऱ्याला फसवले

जत : मंगळवार पेठेतील बिज्जरगी आॅईल मिलचे मालक अशोक बिज्जरगी यांना आठ हजार पाचशे रुपयांची चिल्लर देतो म्हणून अज्ञाताने गंडा घातला. याप्रकरणी त्यांचा मुलगा किरण बिज्जरगी यांनी जत पोलिसात तक्रार केली आहे. चार दिवसांपूर्वी अज्ञाताने मोबाईलवरून संपर्क साधून माझ्याकडे आठ हजाराची चिल्लर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर जत एसटी बसस्थानकासमोरील समता चौकात कोणाला तरी पाठवून द्या, असे सांगितले. किरकोळ तेल आणि पेंड विक्री व्यवसाय करताना सतत चिल्लरची टंचाई जाणवते, त्यामुळे बिज्जरगी यांनी दुकानातील दिवाणजी शंकर सोलापुरे यांना आठ हजार रुपये घेऊन पाठविले. अज्ञात व्यक्ती त्यांच्या प्रतीक्षेत समता चौकात उभी होती. तुम्हाला बिज्जरगी यांनी पाठविले आहे काय, अशी त्यांनी विचारणा केली. दिवाणजीने ‘होय’ असे उत्तर दिले. किती पैसे आणले आहेत, अशी विचारणा करताच दिवाणजीने ‘आठ हजार’, असे सांगितले. त्यानंतर अज्ञाताने आपल्याजवळ आठ हजार पाचशे रुपयांची चिल्लर आहे, असे सांगताच त्यांनी परत जाऊन पाचशे रुपये आणले व अज्ञाताकडे दिले. आपल्याकडे पाच हजाराची चिल्लर आणि साडेतीन हजाराच्या दहा रुपयांच्या नोटा आहेत, असे सांगून अज्ञाताने शंकर सोलापुरे यांना जयहिंद चौकालगत असलेल्या मनमंदिर बॅँकेच्या मुख्य दरवाजासमोर नेले. ‘तुम्ही येथेच बसा, आमच्या घरात कुत्रे आहे, ते तुम्हाला चावेल, तुमच्याजवळ असलेली पिशवी मला द्या, त्यात मी चिल्लर भरून आणतो,’ असे सांगून तेथून त्याने पोबारा केला.बराच वेळ वाट पाहूनही अज्ञात व्यक्ती आली नाही म्हणून सोलापुरे यांनी बिज्जरगी यांना कळविले. त्यांनी त्या अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. (वार्ताहर)