शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूरला विजेतेपद

By admin | Updated: October 26, 2016 00:07 IST

राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा : मुंबई व पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर; राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेशला

सांगली : अत्यंत चुरशीने झालेल्या चौदा वर्षे गटाच्या शालेय राज्य कबड्डी स्पर्धेवर मुलांमध्ये औरंगाबाद, तर मुलींत कोल्हापूर विभागाने ठसा उमटवला. मुंबई व पुणे विभागास दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांमध्ये औरंगाबाद विरूध्द पुणे असा अंतिम सामना झाला. तगड्या औरंगाबादने अनुभवी पुण्याला जेरीस आणत ३६-१७ असा पुण्याचा पराभव केला. मुलींच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या रणरागिणींनी मुंबईला ४६-१७ अशा फरकाने नमवत विजेतेपद आपल्या नावे केले. राष्ट्रीय स्पर्धा हारडा (मध्य प्रदेश) येथे होणार आहेत. क्रीडाधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडल्या. पारितोषिक वितरण महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. शंकर भास्करे यांनी स्वागत केले. आमसिध्द सोलणकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे, शिवाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष बाबा पाटील, उद्योजक किसन गावडे, विजय यादव, नेताजी पाटील, सुनील पुजारी आदी उपस्थित होते. पंच म्हणून विनायक विभुते, जितेंद्र पाटील, मुन्ना आलासे, भालचंद्र जाधव, आलम मुजावर, जयराज पाटील, सुरेश चिखले, झाकीर इनामदार, सुशील गायकवाड, पंकज जाधव, विलास गायकवाड, सुशांत गडदे, रणजित इनामदार, एस. आर. कुंभार यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)सांगलीची पोरं अव्वल... कोल्हापूर विभागाने मुलींमध्ये प्रथम, तर मुलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर विभागाच्या मुले व मुली या दोन्ही यशस्वी संघांवर सांगली जिल्ह्याने आपली मोहोर उमटवली आहे. मुलींच्या संघात बावची (ता. वाळवा) येथील शिवाजी हायस्कूलच्या, तर मुलांच्या संघात कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत विद्यालयाच्या खेळाडूंचा भरणा होता. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : मुले : औरंगाबाद (प्रथम), पुणे (द्वितीय), कोल्हापूर (तृतीय) मुली : कोल्हापूर (प्रथम), मुंबई (द्वितीय), लातूर (तृतीय)