शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

रखडलेल्या कामांना मुख्यमंत्री दौऱ्याचा मुहूर्त

By admin | Updated: December 26, 2015 00:05 IST

संजयकाकांकडून पाहणी : तासगावातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

दत्ता पाटील --तासगाव शहरात नगरपालिकेच्यावतीने व्यापारी संकुलाचे, तसेच जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणी योजनेचे काम सुरु आहे. या दोन्ही योजना तासगावकरांसाठी महत्त्वाकांक्षी आहेत. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या हालगर्जीपणामुळे दोन्ही योजनांचे काम मुदतवाढ देऊनदेखील वेळेत पूर्ण झाले नाही. नुकतीच खासदार संजयकाका पाटील यांनीदेखील या कामांची पाहणी करुन तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तासगावात मुख्यमंत्री दौऱ्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या कामांना मुख्यमंत्री दौऱ्याचा तरी मुहूर्त लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तासगाव शहरात मध्यवर्ती बसस्थानकालगत व्यापारी संकुल आणि भाजीपाला मार्केटच्या कामाला चार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. ३ कोटी ७० लाख रुपयांचे हे काम आहे. मात्र कामाची मुदत संपल्यानंतरदेखील ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही. नगरपालिकेच्यावतीने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ संपली तरीदेखील ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे हे काम रखडले होते. याबाबत नागरिकांतूनही नाराजी व्यक्त होत होती. अखेर खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: लक्ष घातले. कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे व्यापारी संकुलाचे उर्वरित काम तातडीने सुरु झाले आहे.तासगाव शहरातील विस्तारित भागासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय व्हावी, यासाठी तासगाव शहरासाठी तिसऱ्या टप्प्यातील पाणी योजनेलादेखील चार वर्षापूवी मंजुरी मिळाली होती. ही योजना २२ कोटी ५० लाख रुपयांची आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत याचे काम सुरु आहे. या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून तक्रारी आहेतच. मात्र हे कामही ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे मुदतीत पूर्ण झाले नाही. याही कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तासगाव शहरातील नागरिकांना ही योजना मार्गी लागल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खासदार संजयकाकांनी काम गतीने व्हावे, यासाठी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर हे काम गतीने सुरु झाले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तासगावात मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचे नियोजन भाजपच्यावतीने सुरु आहे. या दौऱ्यात शहरातील विकास कामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. रखडलेल्या दोन्ही कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांकडून घेण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यामुळे किमान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना, पण रखडलेली विकासकामे मार्गी लागावीत, अशी तासगावकरांची अपेक्षा आहे.नगरपालिकेच्या नव्या इमारत कामाचाही मुहूर्त तासगाव नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन हा निधी मंजूर करुन दिला आहे. या निधीतून कोकणे कॉर्नरजवळ नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाल्यास, या दौऱ्यात पालिकेच्या नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्त होण्याची शक्यता आहे.