शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे जातीवाचक विधान चूक

By admin | Updated: October 26, 2016 00:17 IST

जयंत पाटील : सोशल इंजिनिअरिंग करताना फडणवीस यांचा गोंधळ

सांगली : केवळ ब्राह्मण असल्याने मला मुख्यमंत्री-पदावरून कोणी काढणार नाही, असे जातीवाचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही कोणी जातीवाचक बोलले नाही. तरीही ते असे का बोलत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध जाती, धर्मांचे मोर्चे निघत असल्याने सोशल इंजिनिअरिंग कसे करायचे, याबाबत त्यांचा गोंधळ झालेला दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील सहकारी, घटक पक्षांचे नेते तसेच विरोधक म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुख्यमंत्री कुंडल्या काढण्याचा दम देत आहेत. शत्रू कोण आहे, हेच देवेंद्र फडणवीस यांना कळेना झाले आहे. त्यांचे सहकारी मंत्रीही या गोष्टींना सामोरे गेले आहेत. आम्ही तर विरोधी पक्षातील असल्याने आम्हाला असा इशारा देणे स्वाभाविक आहे. सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली असताना, अशाप्रकारची दमाची भाषा योग्य नाही. कुंडल्या काढण्याचा इशारा देत कारभार करण्यापेक्षा गोडीगुलाबीने राज्य त्यांनी चालवावे. लोकांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. महागाईचा सामना जनता करीत असताना, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. अंदाजपत्रकामध्ये यांचे सरकार डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते आणि तरीही ऐन सणासुदीला डाळीचे दर गगनाला भिडलेले आहेत. दिवाळी झाल्यानंतर डाळीचे दर उतरतील आणि हेच सरकार दर कमी केल्याचा डांगोरा पिटणार आहे. सामान्य लोकांसाठी कोणतेही नियोजन सरकार करीत नाही, ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत असतानाच पोलिसांवरही हल्ले होत आहेत. सक्षमपणाने गुन्हेगारी मोडीत काढण्याची यंत्रणाच सरकारकडे नाही. गृहमंत्रीपद सोडण्यास फडणवीस तयार नाहीत. स्वतंत्रपणे गृह खाते सांभाळणारा एखादा विश्वासातला सहकारीच त्यांच्याकडे नसावा, असे वाटते. (प्रतिनिधी)साखरेला जादा दर मिळावाएफआरपीपेक्षा जादा दर उत्पादकांना मिळायला हवा, अशी मागणी होत आहे. साखरेला जादा दर मिळाला की ही गोष्टही साध्य होऊ शकते. केंद्र शासनाचे धोरण पाहता, साखरेचे दर वाढूच नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ही नीती ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले. निवडणूक संस्थेची, कारखान्याची नव्हे‘सर्वोदय’च्या निवडणुकीबाबत जयंत पाटील म्हणाले की, ही कारखान्याची निवडणूक नसून, सर्वोदय कारखाना या संस्थेची निवडणूक आहे. शिवसेना लाचार का : सत्ता निरर्थक...सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती आहे. शिवसेना आणि भाजपने एकमेकांना भ्रष्टाचारी म्हणून जाहीर प्रमाणपत्रच दिले आहे. स्वाभिमान जपायचाच असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे. सत्तेत राहण्यात अर्थच उरला नसताना, शिवसेना घटक पक्ष म्हणून सत्तेत आहे. एवढी लाचारी शिवसेना नेते का करीत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांचा कसला नाईलाज आहे, हेसुद्धा कळत नाही. आम्ही समाज एकत्र बांधलापन्नास वर्षे कॉँग्रेस आणि आघाडी सरकारने मराठा समाजाला काय दिले, असा सवाल काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आम्ही जे दिले, ते सांगण्यासाठी वेळही पुरणार नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांत आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्यात यश मिळविले.