शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जतमधील गंधर्व ओढ्याचे पात्र झुडपांमुळे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

फोटो ओळ : जतच्या गंधर्व ओढ्याच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या काटेरी झाडाझुडपांमुळे ओढापात्र गायब झाले आहे. लोकमत न्यूज नेटवर्क जत ...

फोटो ओळ : जतच्या गंधर्व ओढ्याच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या काटेरी झाडाझुडपांमुळे ओढापात्र गायब झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गंधर्व ओढापात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने ओढापात्रच गायब झाले आहे. याकडे जत नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पावसाळ्यात काठावर असलेल्या नागरीवस्तीला पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

येथील गंधर्व ओढ्याला ऐतिहासिक परंपरा आहे. नगरपरिषदेने जत शहरातून नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या ओढापात्रातील झाडे झुडपे काढून या ओढापात्रात नगरोत्थान योजनेतून २०१६ मध्ये कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून सिमेंट काँक्रीटचे नाला बांधकाम केले आहे.

यात नियमानुसार काम न करता खोलीकरणाचे काम कमी केले आहेत. काही ठिकाणी ओढापात्रातील दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे काढली तर काही ठिकाणी ओढापात्रातील अतिक्रमणे न काढता सिमेंट काँक्रीटचे काम केले आहे. ओढापात्रातील रूंदीकरणाची कामे करीत असताना संबंधित ठेकेदारांनी नियमानुसार न करता नियमबाह्य केली आहेत. नगरोत्थान योजनेतून ओढापात्र खोलीकरण व विस्तारीकरण करण्याच्या नावाखाली हे गंधर्व ओढापात्राचे सिमेंट काँक्रीट नाल्यात रुपांतर करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे ओढापात्र आहे. नगरपालिकेला या ओढापात्रातील झाडे, झुडपे व गाळ काढून हे ओढापात्र स्वच्छ ठेवता आले असते. ओढापात्रातील झाडेझुडपे काढून नैसर्गिक प्रवाह कार्यान्वित करणे शक्य होते. दक्षिणेकडे ओढापात्रात दोन्ही बाजूला दगडी पिचिंग काम केले आहेण त्या ओढापात्रात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे उगवून आली आहेत. त्यामुळे ओढापात्र अरुंद झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे.

चाैकट

ओढापात्र काटेरी झुडपात गायब झाले आहे.

पावसाळ्यात जास्त पाणी आले तर पाणी पात्राबाहेर पडणार आहे. ऐन पावसाळ्यात या ओढापात्रातील झाडाझुडपांमुळे जत शहरवासीयांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.

नगरपालिकेकडे स्वतःची जेसीबी मशीन आहे. याद्वारे ओढापात्रातील काटेरी झुडपे काढावीत. अशी मागणी होत आहे.