शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा सोमवारी होणार फैसला

By admin | Updated: May 20, 2016 23:40 IST

नेत्यांच्या केवळ बैठकाच : सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतरच बदल; राष्ट्रवादीतील नाराज गटावर लक्ष

सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्षासह चार सभापतींच्या निवडी होऊन पंधरा दिवस झाले तरीही अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची तक्रार पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा बदलाची चर्चा रंगली आहे. जिल्हाध्यक्षांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी सोमवार, दि. २३ रोजी सांगलीत पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलाविली आहे. या बैठकीतच ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.जि. प.च्या उपाध्यक्ष आणि चार सभापती निवडीमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या समर्थकांना डावलले आहे. यामुळे ते सदस्य सध्या नाराज आहेत. या सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विरोधात भूमिका घेण्याची घोषणा केली आहे. सदस्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी अध्यक्ष बदलाबाबत सावध भूमिका घेतली आहे. शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. पण, या बैठकीमध्ये सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले आहे. सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी दि. २३ रोजी राष्ट्रवादीच्या सांगलीतील कार्यालयात बैठक बोलाविली आहे. मते जाणून घेतल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)हट्ट सोडा, समझोत्याने तोडगा काढाअध्यक्ष पदाच्या स्पर्धेत तासगाव तालुक्यातून कल्पना सावंत, योजना शिंदे, स्नेहल पाटील इच्छुक आहेत. या तीन सदस्यांनी अध्यक्ष पदाचा आग्रह धरला आहे. निवडीनंतर दोन गट विरोधात जाण्याच्या भीतीमुळे नेते सावध भूमिका घेत आहेत. सदस्यांनी समझोत्याने तोडगा काढला असता, तर तीनही सदस्यांना पदे मिळाली असती, पण अध्यक्ष पदाच्या लाल दिव्याच्या वादामुळे सर्वच पदे गमाविण्याची वेळ आली आहे. आता संघर्ष थांबवला नाही, तर शेवटच्या सात महिन्यांसाठीही त्यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता दिसत नाही.