शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाने साखर उद्योग खुला करावा

By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST

शिवाजीराव नाईक : शिवाजी केन प्रोसेसर्स गळीत हंगाम प्रारंभ

कोकरूड : रंगराजन समितीने केलेल्या शिफारसी साखर उद्योगास भरभराटीला आणणाऱ्या असून, असा निर्णय झाल्यास साखर उद्योगावर असणारी ठराविक लोकांची मक्तेदारी संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करीत आता केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने शासनाने साखर उद्योग खुला करीत अंतराची अट काढल्यास शिवाजी केन हा गूळ पावडर, खांडसरी साखर याबरोबर साखर निर्मितीदेखील करणारा राज्यातील पहिला साखर कारखाना असेल, असे प्रतिपादन यशवंत उद्योग समूहाचे संस्थापक आ. शिवाजीराव नाईक यांनी केले.शिवाजी केन प्रोसेसर्स लि. या उसावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, सम्राट महाडिक, माजी सदस्य अभिजित पाटील, मानसिंग बँकेचे जे. के. बापू पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, शिरटेकर, यशवंत ग्लुकोजचे उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, सत्यजित नाईक, अभिजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. पी. चौगुले, सौ. सुनंदा नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, सौ. वेदांतिका नाईक, सौ. देवयानी नाईक उपस्थित हाते. आमदार नाईक म्हणाले की, शिवाजी केन हा सध्या १००० मे. टन ऊस गाळप करणारा कारखाना असून, यामधून गूळ पावडर, खांडसरी साखर उत्पादन करणारा हा पहिला कारखाना आहे. यापुढील काळात केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत असल्यामुळे पूर्वीच्या साखरसम्राटांनी घातलेल्या जाचक अटी रद्द होऊन काही वर्षांत शिवाजी केन पूर्ण क्षमतेने उत्पादन करेल. साखर सम्राटांचा शेतकऱ्यांचा पैसा इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जमा करून काही गावात हाच पैसा विकासाच्या नावाखाली खर्च करण्याचा उद्योग सुरू आहे. कारखान्याचा कारभार काटामारी व वशिलेबाजीला थारा न देता पारदर्शकपणे चालविला जाईल. येत्या दोन वर्षांत वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर चांदोली प्रकल्पातील सर्व प्रश्न सोडवले जातील. येत्या काही वर्षांत वाळवा तालुक्यात नवीन प्रकल्प उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)