शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयप्रकरणी आणखी तीन डाॅक्टरांची चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्य वधाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस ...

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्य वधाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे. डाॅ. जाधव याने आर्थिक फायद्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी एमडी मेडिसीन डाॅक्टरांसह अन्य काही डाॅक्टरांची कागदोपत्री नियुक्ती दाखविली आहे. रुग्णांवर उपचाराबाबत या डाॅक्टरांच्या भूमिकेच्या चाैकशीसाठी संबंधित डाॅक्टरांना पोलिसांनी पाचारण केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. कोविड रुग्णांवरील उपचारातील गैरप्रकारांबद्दल डाॅ. जाधव याच्या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या इतर सातजणांनाही पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयातील उपचाराबाबत महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीमुळे डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी नसतानाही दोन महिन्यात २०५ रुग्ण दाखल करुन घेण्यात आले. यापैकी ८९ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सिव्हिलच्या डाॅक्टरांची समिती रुग्णांवर झालेल्या उपचारांची छाननी करीत आहे.