शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

घरफोडी, जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहर व परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहर व परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दहा गुन्हेही उघडकीस आले आहेत.

गेंडा उर्फ आकाश संतोष जाधव (वय १९, रा वाल्मीकी आवास), करण रामा पाटील ( २१, शहालुल्लानगर, कुपवाड एमआयडीसी), रोहित बाळू सपाटे (१९, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, वाल्मीकी आवासजवळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ आकाश जाधव व करण पाटील हे दोघेजण पैश्याच्या कारणावरून भांडत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी घेतली. यावेळी आकाश व करण हे दोघेजण समाजकल्याण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दंगा करीत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. आकाश याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व एक टॅब, तर करण याच्याकडे सोन्याचे नाणे व एक फूलसाखळी मिळून आली, तर करण पाटील याच्याकडे सोन्याचे एक नाणे व कानातील फूलसाखळी असा चोरीचा माल मिळून आला.

या मुद्देमालाबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता वाल्मीकी आवासमधील एका बंद घरातून सोने-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली आकाश जाधव याने दिली.

पोलिसांनी खाक्या दाखविताच आकाश याने मित्र करण गायकवाड व एका अल्पवयीन मुलासोबत बायपास रोडवर एका वृद्ध व्यक्तीच्या हातावर दांडके मारून त्यांचा मोबाइल चोरल्याचे सांगितले. याशिवाय गणेश शाॅपिंग सेंटरमधून काही दुकाने फोडून रोकड चोरली होती. बायपासरोडवरील एका कार्यालयातून टॅब चोरल्याचीही कबुली दिली. लठ्ठे सोसायटी व पंचशीलनगरमध्येही चोरीचा प्रयत्न केला होती. पण लोकांनी पाठलाग केल्याने तो अयशस्वी झाल्याचेही आकाश याने पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून सोन्याचे मंगळसुत्र, कानातील रिंगा, सोन्याची ठुशी, फुले, चांदीचे बिजोड्या, जोडवी, अंगठ्या, चांदीची आरती, मोबाईल व रोकड असा ५० हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

चौकट

टोळीवर अनेक गुन्हे

आकाश जाधव, करण पाटील व रोहित सपाटे या तिघांच्या टोळीवर सांगली शहर पोलीस ठाण्यात नऊ घरफोडी, जबरी चोरीचे तर संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत पोलिसांनी दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.