शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात कडकडीत बंद

By admin | Updated: August 22, 2014 00:53 IST

निषेध मोर्चा : सोशल मीडियावरील बदनामी प्रकरण

विटा : सोशल मीडियावर विटा येथील एका तरुणाने कॉँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठविल्याप्रकरणी संतप्त कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी शहरात निषेध मोर्चा काढला. शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्र पाठविणाऱ्या शहरातीलच एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला सकाळी अटक केली.येथील एका तरुणाने कॉँग्रेसचे आ. पाटील यांचे व्हॉटस् अपवर आक्षेपार्ह छायाचित्र पाठविले होते. त्यामुळे शहरात बुधवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बुधवारी रात्री आठ वाजता माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, नगरसेवक विशाल पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे यांच्यासह शेकडो तरुणांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. त्यानंतर शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आज सकाळी दहापर्यंत संबंधितास अटक न केल्यास विटा बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळी शहरातील हजारो तरुण आ. पाटील यांच्या निवासस्थानी एकत्रित आले. त्यावेळी आ. पाटील यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. परंतु, युवक व कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. सकाळी १०.३० वाजता शिवाजी चौक, खानापूर रोड, कऱ्हाड रोड, मायणी रोड यासह अन्य उपनगरांतून घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शहरात व्यापाऱ्यांनीही बंद पाळून या घटनेचा निषेध केला. (वार्ताहर)