शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील दोघींना आखाती देशात डांबले

By admin | Updated: June 29, 2016 00:07 IST

नातेवाइकांची तक्रार : बंगालमधील एका महिलेचाही समावेश; अत्याचारपीडितेचा आत्महत्येचा इशारा

मिरज : नोकरीचे आमिष दाखवून मिरजेतील दोन महिलांसह तिघींना आखाती देशात डांबून ठेवण्यात आले आहे. एका महिलेच्या नातेवाइकांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार दिली असून, तिची तातडीने सुटका न केल्यास अत्याचारपीडित महिलेने आत्महत्येचा इशारा दिल्याने तिचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.मिरजेतील विद्या नामक महिला राधिका लोंढे या एजंट महिलेमार्फत मुंबईतील मुजफ्फर नामक एजंटाच्या संपर्कात आली. लोंढे व मुजफ्फर यांनी सौदी अरेबियामध्ये श्रीमंत व्यक्तीच्या घरात मुले सांभाळण्याचे काम असल्याचे सांगून तेथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष तिला दाखविले. दरमहा ३० हजार पगाराचे आश्वासन देऊन विद्याला ७ जून रोजी सौदी येथे पाठविले. तेथे पोहोचल्यानंतर मुले सांभाळण्याऐवजी तिला साफसफाई व स्वच्छतेचे काम असल्याचे सांगून १५ हजार रुपये वेतनावर दररोज बारा ते चौदा तास कामाला जुंपण्यात आले. तिने काम करण्यास नकार देऊन परत पाठविण्याची मागणी केल्याने, तिचा व्हिसा व पासपोर्ट काढून घेऊन तिला मारहाण करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय भारतात पाठविण्यात येणार नसल्याचे सांगून विद्याला मारहाण करून काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे. मिरजेतील रुबिका या तरुणीसही अशाच पद्धतीने चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून फसवून नेण्यात आले आहे. तिलाही परत जाऊ न देता डांबून मारहाण करून साफसफाईची कामे करवून घेण्यात येत आहेत. आणखी एक बंगाली तरुणीही तेथे अडकल्याचे विद्याने मिरजेतील नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी मुंबईतील मुजफ्फर या एजंटाशी संपर्क साधला असता, त्याने तिला परत आणण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली. याबाबत शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करून, आखाती देशात जबरदस्तीने डांबून ठेवलेल्या तरुणीची सुटका करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. आखाती देशात नोकरीसाठी मिरजेतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने गेल्या असून, त्यांच्या फसवणुकीच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)