शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर वाळू तस्करांच्या ‘सातबारा’वर बोजा नोंद

By admin | Updated: June 18, 2015 00:38 IST

तासगाव तहसीलदारांची कारवाई : ३.७० कोटींचा दंड

तासगाव : तासगाव तालुक्यात बेकायदा वाळू उपसा आणि तस्करी केल्याप्रकरणी सध्याच्या आणि तत्कालीन तहसीलदारांनी १११ जणांवर दंडात्मक कारवाई केली होती. दंड न भरल्यामुळे संबंधितांच्या सात बारावर ३ कोटी ७० लाख १५ हजार रुपयांचा बोजा नोंद करण्यात आला आहे. तालुक्यातील वाळू तस्करी बंद करण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी जागता पहारा ठेवला असून, बुधवारी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तिघांना २ लाख २६ हजार रुपये दंड ठोठावला आहे.तहसीलदार सुधाकर भोसले यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडल अधिकारी, लिपिक, तलाठी यांची पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून तालुक्यात दिवसा आणि रात्रीही पहारा सुरूआहे. तालुक्यातील बेकायदा वाळू उपसा शंभर टक्के बंद करण्यासाठी महसूल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी सातजणांची वाळू तस्करी पकडून त्यांना ६७ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यापैकी धनाजी चव्हाण यांनी ४४ हजार ८०० रुपये दंडाची रक्कम भरली. उर्वरित सहाजणांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारावर दंडाच्या रकमेइतका बोजा नोंद करण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना देण्यात आले आहेत. दोन वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत ६७ जणांना २ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे संबंधितांनी अपील केले होते. त्याठिकाणीही कारवाईचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे ६७ जणांसह आतापर्यंत तासगाव तालुक्यातील १११ जणांच्या सातबारावर ३ कोटी ७० लाख रुपयांच्या दंडाची रक्कम बोजा स्वरुपात नोंद करण्यात आली आहे.बुधवारी तहसीलदार भोसले यांनी केलेल्या कारवाईत श्रीकांत बुर्ले (तुरची) यांना ८८ हजार २००, धनाजी मुडदे (लांडगेवाडी) यांना ८८ हजार २००, तर अरविंंद शिंंदे (आरवडे) यांना ५० हजार ४०० रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई करुन सातबारावर बोजा नोंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. बेकायदा वाळूचा उपसा केल्याप्रकरणी सातबारावर बोजा नोंद केल्यामुळे तासगाव तालुक्यातील वाळू तस्करांच्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)