शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:05 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी यांच्या काळ्या मातीतील तालमीत तयार झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता कोल्हापूरचे भाजपमधील वस्ताद महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लाल मातीच्या तालमीत आगामी लोकसभा आणि विधानसभा मैदानाची तयारी सुरू केली आहे. यासाठी या दोन्ही मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकरी नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी यांच्या काळ्या मातीतील तालमीत तयार झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता कोल्हापूरचे भाजपमधील वस्ताद महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लाल मातीच्या तालमीत आगामी लोकसभा आणि विधानसभा मैदानाची तयारी सुरू केली आहे. यासाठी या दोन्ही मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय जोर—बैठका काढून शड्डूही ठोकला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळातील आपले स्थान भक्कम केले. परंतु त्यांच्याबद्दल शेतकºयांमधूनच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. म्हणूनच त्यांनी आता शेतकºयांचे नेते म्हणून भाजपची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रथम विकास आघाडीचे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांना भाजपमध्ये आणले. याव्यतिरिक्त त्यांच्या गळाला काहीच लागलेले नाही. म्हणूनच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघ केंद्रबिंदू ठेवून भाजपच्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे.सांगली — सातारा — कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजपचे मंत्री, विद्यमान खासदार, आमदार, जि. प. अध्यक्ष, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आदी प्रमुख पदाधिकाºयांचा गोपनीय मेळावा इस्लामपूर येथे निशिकांत पाटील यांच्या शिक्षण संकुलात झाला. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याची रणनीती ठरविण्यात आली, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अगोदरच शड्डू ठोकला आहे. त्यांनाच बळ देण्यावरही मंथन झाले.इस्लामपूर, शिराळा, पलूस—कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय काम अत्यंत चांगले झाले आहे. या मतदारसंघात भाजपला घवघवीत यश मिळेल, असाही सूर या बैठकीतून निघाला.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ३० वर्षाहून अधिक काळ आमदार व मंत्री म्हणून इस्लामपूर मतदारसंघावर असलेली पकड ढिली करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जंग जंग पछाडावे लागणार, हे मात्र निश्चित.म्हणूनच इस्लामपूर केंद्रस्थानी...जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न, राजू शेट्टी यांना रोखण्याची तयारी करताना चारही लोकसभा मतदारसंघांशी जुळलेली इस्लामपूरची नाळ हेरून भाजपकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघच केंद्रबिंदू ठेवून भाजपच्या नेत्यांना आमंत्रित केले जात आहे.