शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाकुर्डे खुर्दच्या सरपंचपदी भाजपच्या मेघा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST

कोकरुड : वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मेघा जाधव या विजयी झाल्या; तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया पाटील ...

कोकरुड : वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मेघा जाधव या विजयी झाल्या; तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया पाटील यांना चार मते मिळाली. विजयानंतर जाधव समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.

लोकनियुक्त सरपंच शांताराम जाधव यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपकडून मेघा जाधव, तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात जाधव यांना पाच मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कानडे यांनी त्यांना विजयी घोषित केले.

मेघा जाधव या माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या समर्थक आहेत. या निवडीने भाजपने ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे.

यावेळी माजी सरपंच शांताराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य रणजित वाकुर्डेकर, शामराव परीट, कांचन संवादकर, विकास पाटील, तानाजी जाधव, गजानन पाटील, बाबूराव संवादकर, मोहन गुरव, उदय वाकुर्डेकर, महादेव जाधव आदी उपस्थित होते. निवडनंतर मेघा जाधव यांचा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सत्कार केला.

फोटो-१५कोकरुड१

फोटो ओळ : वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) ग्रामपंचायतीच्या सरपंदपदी मेघा जाधव यांची निवड झाली. यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत त्यांचे अभिनंदन केले.