शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भाजपचे मराठी प्रेम बेगडीच!

By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST

नितीन बानुगडे-पाटील : मराठी शाळांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम

सांगली : कर्नाटक सीमेलगत जत तालुक्यात असलेल्या ४२ शाळांमध्ये मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दहा दिवसात या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, जत तालुक्यातील सीमाभागात मराठी शाळांची कमतरता आहे. येथील पालकांना त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा सुरू व्हावी, असे वाटत असतानाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ४२ गावांमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाकडे सादर झाला आहे. यासाठी छाननीतून ६० संस्थांची निवडही केली होती. याप्रश्नी शिवसेना नेत्या आ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत मराठी शाळांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला, तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही येथील मुलांना कन्नड भाषेतूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने कन्नड भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील शाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या सीमाभागातील महाराष्ट्र शासनाच्या शाळांच्या कार्यक्रमांना कर्नाटकचे मंत्री उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्तावित शाळांना तातडीने दहा दिवसात मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही या सर्व गावांमध्ये आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील दुष्काळाकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. पणनमंत्र्यांनी जर थेट शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची योजना हाती घेतली असेल, तर आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महात्मा फुलेंचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींना शिक्षणाची दारे केवळ गुंडांच्या दहशतीमुळे बंद करावी लागत असतील, तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने या मुलींना संपूर्ण संरक्षण दिले नाही, तर शिवसेना त्यांना संरक्षण देईल, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही. भाजपमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक प्रश्नांसाठी आता आम्हालाच आंदोलन करावे लागत आहे, असे बानुगडे-पाटील म्हणाले.