शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची ‘एन्ट्री’, मग विकास आघाडीचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली इस्लामपूर नगरपालिका निवडणूक महाडिक समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर लढविणार ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली इस्लामपूर नगरपालिका निवडणूक महाडिक समर्थकांनी भाजपच्या चिन्हावर लढविणार असल्याचे घोषित केले आहे. पालिकेत भाजपची थेट एन्ट्री होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाडिक बंधू देत असले तरी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात तयार करण्यात आलेल्या विकास आघाडीचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर महाडिक युवाशक्तीचे राहुल आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने या दोघांनाही पक्षवाढीसाठी राज्य पातळीवर पदे दिली आहेत. त्यामुळे वाळवा, शिराळ्यात पक्षबांधणीचे काम जोरात सुरू आहे. परंतु त्यांना भाजपमधीलच काही नेत्यांची साथ मिळत नाही. असे असले तरी आगामी पालिका निवडणुकीत कमळ चिन्ह घेऊन लढण्याचा निर्धार महाडिक समर्थकांनी केला आहे. नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, मन्सूर मोमीन, चेतन शिंदे, बंडा रासकर, रुपाली साळुंखे, अ‍ॅड. फिरोज मगदूम, विशाल शिंदे यांच्यासह महाडिक समर्थकांनी तसे सांगितले आहे.

मागील पालिका निवडणुकीआधी विकास आघाडीची मोट बांधण्यात दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे मोठे योगदान होते. या आघाडीत शिवसेनेचाही सहभाग आहे. त्यातच इस्लामपुरात भाजपमध्येच दुफळी आहे. त्यामुळेच आता भाजपच्या चिन्हावर लढताना अंतर्गत मतभेदाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. मग या आघाडीतील शिवसेना, कॉँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे काय? हेही प्रश्न उपस्थित होणार आहेत.

कोट

मागील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय नेते विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले होते. आगामी निवडणुकीतही विकास आघाडीची मोट बांधण्यासाठी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू.

-आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख तथा गटनेते, शिवसेना, इस्लामपूर नगरपालिका