शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

भाजपचे खासदार; राष्ट्रवादीचे शिलेदार

By admin | Updated: October 20, 2015 23:50 IST

३८ ग्रामपंचायतीत सामना : आबा-काका गटात वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच

दत्ता पाटील-- तासगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीच्या प्रक्रियेतच मोराळे ग्रामपंचायत बिनविरोध करून भाजपने सत्तेचे सीमोल्लंघन केले आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी पक्षीय नेत्यांवर अवलंबून न राहता स्वबळावर आपापली तटबंदी शाबूत राखण्यासाठी यंत्रणा लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपचे खासदार, तर राष्ट्रवादीचे शिलेदार असेच चित्र दिसत आहे. पारंपरिक आबा आणि काका गटात वर्चस्वासाठी टोकाची रस्सीखेच होणार असल्याचेही दिसून येत आहे. तासगाव तालुक्यातील संस्थांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींवर सत्ता असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. याचा फटका खासदार संजयकाका पाटील यांना बाजार समितीच्या निवडणुकीत बसला होता. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना, तासगावसारख्या होम ग्राऊंडवर वर्चस्व ठेवण्यासाठी खासदार पाटील यांनी यावेळी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच तालुक्यातील प्रत्येक गावात थेट संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादीतील नाराज कार्यकर्त्यांना हेरुन, त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी राजकारणात अभिप्रेत असलेल्या सर्व शक्यतांचा वापर करून वर्चस्वासाठी लढाई सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासूनच वातावरण निर्मिती करण्यात संजयकाकांनी यश मिळविले. त्यामुळेच अर्ज दाखलच्या टप्प्यातच राष्ट्रवादीला धक्का देत मोराळे ग्रामपंचायतीतील सर्व सात जागा बिनविरोध करून भाजपचा झेंडा फडकविला. तसेच विजयनगर, हातनोली, डोर्ली, धोंडेवाडी येथील काही जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले. खासदार पाटील यांच्या आक्रमक राजकीय वाटचालीला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीत वरच्या पातळीवरून अद्यापही हालचाली होताना दिसत नाहीत. मात्र सद्यस्थितीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. वर्षानुवर्षे सत्तेत असल्याचा फायदा करून घेण्यासाठी तसेच स्वत:चा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या गावापुरती व्यूहरचना केली आहे. राष्ट्रवादीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सत्ता कायम ठेवण्याचा चंग बांधूनच कंबर कसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे खासदार संजयकाका पाटील, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत चुरशीचा रंग भरला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे रणधुमाळीत सुरुवातीपासूनच भाजपचे खासदार संजयकाका पाटील मैदानात उतरुन व्यूहरचना आखत आहेत, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि स्मिता पाटील यांनीही लक्ष केंद्रित केले आहे.मोराळेचा प्रश्न : बिनविरोध जागांवर दावा मोराळे ग्रामपंचायतीतील सात सदस्यांसह बिनविरोध निवडून आलेल्या १८ जागांवर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाने दावा केला आहे. विजयनगर ग्रामपंचायतीत सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर दोन जागांसाठी निवडणूक लागणार आहे. बिनविरोध पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या असल्याचा दावा खासदार गटाकडून होत आहे, तर पाचपैकी चार जागा आबा गटाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे बिनविरोध जागांवर दावा सांगण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे.बंडखोरी, नाराजीचा सामनातालुक्यातील बहुतांश गावात भाजप आणि राष्ट्रवादीतच दुरंगी सामना होणार आहे. मात्र राष्ट्रवादीअंतर्गत काही गावांत दोन गट आहेत, तर भाजपलाही सत्तेची लागण झाली असल्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही काही गावांत नाराजीचा सामना करावा लागणार आहे. तसेच नागाव (क), येळावी आणि जुळेवाडी येथे काँग्रेस मैदानात आहे. तसेच कवठेएकंदमध्ये शेकापची ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शेकापचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.ग्रामपंचायतनिवडणूक