शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

जिल्हाधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी--लेटलतिफांना बसणार चाप :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत. कारण, दहा तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ...

ठळक मुद्दे सर्व तहसील कार्यालयांमध्येही अंमलबजावणी होणारअधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत. कारण, दहा तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, नागरिकांना गतिमान प्रशासन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यात येणार आहे.

कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा कर्मचारी, अधिकारी कार्यालयात दिसत नाहीत. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या दांड्या मारण्याला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांना येताना आणि जाताना हजेरी द्यावी लागणार आहे. दौºयावर असेल त्यावेळी बायोमेट्रिक हजेरी यंत्राचा वापर करूनच जायचे आहे. ज्या तहसील कार्यालयात कर्मचारी दौºयावर असेल, तेथील यंत्रावर हजेरीची व्यवस्था केली आहे. या आधुनिक यंत्रामुळे लेटलतिफ अधिकारी, कर्मचाºयांवर निर्बंध बसणार आहेत.जप्त वाळूचे : लिलाव काढणारजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून अवैध वाळूच्या साठ्यांवर कारवाई करून ती जप्त केली आहे. या वाळूचा येत्या आठ दिवसात लिलाव काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून होणाºया अवैध वाळू वाहतुकीविरोधात सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मी एकत्रित मोहीम पुढील महिन्यात राबविणार असल्याचे विजय काळम-पाटील यांनी सांगितले.प्रलंबित फायलींपासून १० कोटींचा महसूलजिल्हाधिकारी कार्यालयात महार वतनाच्या एक हजार फायली प्रलंबित असून त्या निकाली काढण्यासारख्या आहेत. या फायलींचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिल्या आहेत. या फायली निकाली काढल्यामुळे नागरिकांची तर गैरसोय दूर होणार आहेच, शिवाय राज्य शासनाला जिल्ह्यातून दहा कोटींचा महसूल मिळण्यास मदत होणार आहे. उर्वरित आठ विभागांच्या प्रलंबित फायलीही येत्या महिन्याभरात निकाली काढणार असल्याचेही विजय काळम-पाटील यांनी सांगितले.भेसळ करणाºयांवर कठोर कारवाईदिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर तेल, खवा अशा पदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणात भेसळ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने जिल्ह्यातील दुकाने आणि उत्पादन होणाºया ठिकाणांची तपासणी करून अहवाल देण्याची सूचना दिली आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास अचानक तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी सांगितले.