शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST

शिवसैनिकांची दगडफेक : अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल आयलँड फोडला

मिरज : मिरज येथे हिरा हॉटेल चौकात कारने ठोकरल्याने आकाश संदीप सातपुते (वय २२, रा. उदगाव वेस) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. मराठा सेवा संघाने चौकात उभारलेल्या आयलँडमुळे अपघात झाल्याची तक्रार करीत मृताचे नातेवाईक व शिवसेना कार्यकर्त्यांनी आयलँडची तोडफोड केली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून (एमएच १0, आरएस ४१७४) आकाश सातपुते हा बसस्थानकाकडून हिरा हॉटेल चौकाकडे जात होता. यावेळी आंबेडकर उद्यानाकडून चौकाकडे आलेल्या डॉ. संजय सूर्यवंशी यांच्या चारचाकीची (एमएच १0, एएन १७९८) त्याच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरून उडून खाली पडल्याने आकाश सातपुते जागीच ठार झाला. नागरिकांनी सातपुते यास उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात नेले; पण त्यास मृत घोषित करण्यात आले. आकाश सातपुते याचा बसस्थानकाजवळ भाजी विक्रीचा स्टॉल होता. रविवारी सकाळी साहित्य आणण्यास मार्केटमध्ये जात असताना हा अपघात झाला. दुपारी कृष्णा घाट स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आकाशचे नातेवाईक, मित्र व शिवसेना कार्यकर्त्यांनी, हिरा हॉटेल चौकाच्या सुशोभीकरणासाठी उभारलेल्या आयलँडमुळेच आकाशचा अपघात झाल्याची तक्रार करीत आयलँडवरच हल्ला चढविला. हातोडी, कुदळ घेऊन आलेल्या जमावाने नवीन बांधलेले आयलँड उद्ध्वस्त केले. सुमारे अर्धा तास जमावाची तोडफोड सुरू होती. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या बसेसवरही जमावाने दगडफेक करून वाहतूक बंद पाडली. घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांना पिटाळून लावण्यात आले. पोलीस आल्यानंतर जमाव पांगला. आयलँडची मोडतोड केल्याचे वृत्त समजताच मराठा सेवा संघाचे कार्यकर्तेही चौकात एकत्रित झाले. सेवा संघाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आयलँड उद्ध्वस्त केल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, प्रशांत मोरे, सोमनाथ माणकापुरे, शंकर परदेसी, जुबेर शेख, राजू माळी, मोहन गायकवाड, संदीप शिंदे, पोपट सातपुते, उमेश जामदाडे, पंकज मोरे, राजू शेवकारे यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सातपुते याच्या मृत्यूप्रकरणी डॉ. संजय सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चौकात असलेला पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने संशयित आरोपींचा शोध सुरूअसल्याचे पोलिसांनी सांगितले. तोडफोड व दगडफेकीच्या घटनेनंतर हिरा हॉटेल चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (वार्ताहर)