शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची माहिती मागवली - दहशतवादविरोधी पथक :

By admin | Updated: July 29, 2014 22:56 IST

चोरीस गेलेल्या वाहनांवर लक्ष

सांगली : पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांत चोरीस गेलेल्या दुचाकींची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथक व गुन्हे अन्वेषण (क्राईम ब्रँच) विभागाने मागविली आहे. ही माहिती तातडीने सादर करण्याचा आदेश दिल्याने सांगलीच्या पोलीस मुख्यालयात आज (मंगळवार) गेल्या दहा वर्षातील रेकॉर्ड काढण्याचे काम सुरू होते.पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात बॉम्बस्फोट झाला होता. एका दुचाकीमध्ये स्फोट झाल्याचे आढळून आले होते. या दुचाकीच्या क्रमांकावरुन ती कऱ्हाड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र या पोलिसाची दुचाकी चोरीस गेली होती, यासंदर्भात त्याने कऱ्हाड पोलिसांत दुचाकी चोरीची तक्रारही नोंदविली होती. पुण्यात दोनवेळा बॉम्बस्फोटाची घटना घडल्याचे गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे. स्फोटासाठी दुचाकीचा वापर झाल्याच्या घटनेमुळे दुचाकी चोरीची माहिती मागविण्याचा निर्णय एटीएस व गुन्हे अन्वेषण विभागाने गेला आहे. दुचाकी चोरीच्या सातत्याने घटना घडतात. जिल्ह्यात २२ पोलीस ठाणी आहेत. दररोज एखाद्या तरी ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडत असतेच.दुचाकी चोरीस गेल्यानंतर तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिसात आल्यानंतर प्रथम त्याची कच्ची नोंद करुन घेतात. दोन-चार दिवस तपास केला जातो. यातूनही दुचाकी सापडली नाही, तर मग पक्की नोंद केली जाते. दहशतवादविरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाने चोरीला गेलेल्या दुचाकींची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील पोलिसांना दिला आहे. येत्या चार दिवसात याचा अहवाल द्यायचा असल्याने जुने रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. (प्रतिनिधी)