शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात सायकल वाटपात गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:44 IST

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून, महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींसाठी सायकलींसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप न करता, त्याएवेजी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय आहे. मात्र हा निर्णय बासनात गुंडाळून तासगाव पंचायत ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून, महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींसाठी सायकलींसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप न करता, त्याएवेजी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय आहे. मात्र हा निर्णय बासनात गुंडाळून तासगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल वाटप करण्याचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे. यात टक्केवारीचाही झोल झाला आहे.या सायकल वाटपासाठी लाभार्थ्यांकडून तीनशे रुपयांप्रमाणे पैसेही गोळा करण्यात आल्याचे चव्हाट्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मावळत्या सभागृहाने महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून शालेय मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्चपूर्वी निधी खर्ची टाकण्यासाठी धावपळदेखील झाली होती. मार्चपूर्वीच जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार तालुकास्तरावर प्रस्ताव गोळा करुन जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.राज्य शासनाने लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्याच्या निर्णयात बदल केला आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना जिल्हा परिषद स्तरावरुन वस्तू खरेदी करुन थेट दिली जात होती. मात्र अशा प्रकारामुळे लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची वस्तू मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे शासनाने वस्तूऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी झालेल्या सायकल वाटपाऐवजी सायकलचे ३ हजार ९०० रुपयांप्रमाणे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन प्रस्तावासोबत लाभार्थ्याने सायकल खरेदी केलेली पावती आणि बँक खाते नंबर घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून प्रस्तावाची तपासणी करुन संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले होते.बहुतांश तालुक्यात याच पध्दतीने अंमलबजावणी झाली आहे. मात्र तासगाव तालुक्यात सायकल वाटपात गोलमाल झाल्याचे दिसून येत आहे. मार्चमध्ये लाभार्थ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर बहुतांश तालुक्यात एप्रिल, मे महिन्यात संबंधित लाभार्थ्यांनी सायकल खरेदी केली होती. मात्र तासगाव तालुक्यात तब्बल तीन महिन्यानंतर, चार दिवसांपूर्वी अनुदानाऐवजी थेट सायकलींचेच वाटप करण्यात आले आहे. शासनआदेशाला हरताळ फासून पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाकडून थेट पंचायत समितीच्या आवारात खुलेआमपणे सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर या सायकल वाटपासाठी प्रस्तावासोबतच एका कर्मचाºयाने तीनशे रुपये घेतल्याचेही चव्हाट्यावर आले आहे.एकीकडे लाभार्थ्याकडून तीनशे रुपये, आणि दुसरीकडे लाभार्थ्याने स्वत: सायकल खरेदी करावयाची असतानादेखील, एका एजन्सीच्या माध्यमातून सायकल खरेदी करुन टक्केवारी, असा दुहेरी मलिदा मिळविण्यासाठी खटाटोप करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून, शासनाचा आदेश गुंडाळून ठेवत, कागदोपत्री मेळ घालून खरेदीचे उद्योग अद्यापही सुरु असल्याचे उजेडात आले आहे. याची चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वाटपात ‘इंटरेस्ट’ : बदलीनंतरही...तासगाव पंचायत समितीत महिला व बालकल्याण विभागात कार्यरत असणाºया एका कनिष्ठ सहाय्यक कर्मचाºयाची ३१ मेरोजी दुसºया तालुक्यात बदली झाली. याच कर्मचाºयाकडे सायकल अनुदानाचा विषय होता. बदली झालेल्या कर्मचाºयाचा पदभार दुसºया कर्मचाºयाने घेतला होता. मात्र अद्याप बदली झालेल्या संबंधित कर्मचाºयाचा सायकल वाटपात इंटरेस्ट कायम होता. अगदी गुरुवारी पंचायत समितीत सायकल वाटपावेळी संबंधित कर्मचारी तासगाव पंचायत समितीत आल्याचे दिसून आले. त्यामुळे या कर्मचाºयाचा बदलीनंतरही सायकल वाटपात असलेला ‘इंटरेस्ट’ चर्चेचा विषय ठरला आहे.वाळवा तालुक्यातून सायकलींची खरेदीवाटप केलेल्या सायकलींचा पुरवठा वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील एका पुरवठादाराने केला आहे. संबंधित पुरवठादाराचा कोणताही सायकल विक्रीचा व्यवसाय नाही. मात्र तरीदेखील त्याने ४० सायकलींचा पुरवठा केला आहे. तासगाव व सांगलीसारखे ठिकाण खरेदीसाठी सोयीचे असतानादेखील, वाळवा तालुक्यातून सायकली खरेदीमागे टक्केवारीचा संशय व्यक्त होऊ लागला आहे.अधिकारी, लोकप्रतिनिधी अनभिज्ञसायकल वाटप अनुदानासाठी तत्कालिन जिल्हा परिषद सदस्यांनी नावांची शिफारस केली होती. मात्र यापैकी एकाही सदस्यास सायकल वाटपाची माहिती नाही. पंचायत समितीच्या आवारात झालेल्या सायकल वाटपाबाबतही पदाधिकारी आणि अधिकारीही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. सायकल वाटपाची माहिती घेण्यासाठी काही तत्कालिन जि. प. सदस्यांशी सपर्क केला असता, या सदस्यांनीही लाभार्थ्यांकडून माहिती घेतली. लाभार्थ्यांकडून एका कर्मचाºयाने तीनशे रुपये घेतल्याचे त्यांना समजले. तसेच खरेदीची पावतीही संबंधित कर्मचाºयानेच उपलब्ध करुन दिल्याचेही सांगितले. इतकेच नव्हे, तर लाभार्थ्यांची स्वत:च्या गावात बँक खाती असतानादेखील, तासगावमध्ये नव्याने बँकखाते काढण्यास सांगितल्याची माहितीही निदर्शनास आली.