शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

दुधोंडीत भोंदू ‘डॉक्टर’चा पर्दाफाश

By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST

‘अंनिस’ची तक्रार : दारू सोडविण्याच्या आमिषाने ‘पानाचे औषध’

कुंडल : खाऊचे पान देऊन दारू सोडण्याचे औषध म्हणून भोंदूगिरीचा प्रकार करणाऱ्या व ‘मेजर डॉक्टर’ या नावाने परिचित असणाऱ्या हणमंत रंगराव बजबळे (रा. कुुपवाड) व त्याला मदत करणाऱ्या आशिष आप्पासाहेब वालेकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर दुधोंडी (ता. पलूस) येथे कुुंडल पोलिसांनी पकडले. मेजर डॉक्टर या नावाने बजबळे गेली अनेक वर्षे दारू सोडण्याचे औषध द्यायचा. त्याचा वावर महाराष्ट्राच्या विविध भागात होता. केवळ पान खायला देऊन दारू सोडवतो, अशी त्याची प्रसिद्धी होती. यासाठी तो दरबार भरवत असे. या दरबारात प्रारंभी ‘दारूचे दुष्परिणाम’ यावर प्रवचन देत असे व माझ्या औषधाने दारू सुटली नाही, तर पाच लाख रुपये देईन, अशी घोषणा करीत असे. दारू सोडण्यासाठी तो एक पान तयार करून आणत असे. त्याचे वाटप दरबारात केले जात असे. पान समोर बसून खायला सांगे. त्यानंतर ५ ते ६ वेळा पान खावे लागेल, असे तो सांगत असे. लोकही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितलेल्या तारखांना त्याच्या ‘दरबारात’ हजेरी लावत असत. सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘अंनिस’चे कार्यकर्ते दुधोंडी येथे दरबारात जाऊन बसले व मेजर डॉक्टर म्हणून परिचित असणाऱ्या हणमंत बजबळे त्यास मदत करणारा आशिष वालेकर यास पकडले. या दरबारात ५० ते ६० लोक होते. कुंडल पोलीस ठाण्यात आणल्यानंतर बजबळे याने शरणागती पत्करली आणि आपल्याकडे कुठलेच औषध नसल्याची कबुली दिली. कुंडल पोलिसात त्याच्याविरोधात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, जावेद पेंढारी, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, बाळासाहेब पाटील, राजू कदम, डॉ. सुरेश शिंदे सहभागी झाले होते. (वार्ताहर) ११० रुपयांना पान दारू सोडण्याचे कोणतेही प्रभावी औषध नसताना, बजबळे हा लोकांच्या जिवाशी खेळत होता. त्यास कोणतेही वैद्यकीय ज्ञान नाही. ‘पानाचे औषध’ अशी जादुई आवई उठवून तो महाराष्ट्रात फिरत असे. ठिकठिकाणी दरबार भरवून, दारू सोडविण्यासाठी गरजूंची अक्षरश: लूट करीत असे. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने या औषधात दारू सोडण्याचे कोणतेच औषध नसून, पानात सोडा, ओवा, दगडफूल, बदामफूल, जायफळ व मेथी घालून ते पान खायला देत असल्याचे कबूल केले. एक पान ११० रुपयांना दिले जायचे, असे त्याने सांगितले.