शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बिळूरला काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी, भाजपचा शड्डू

By admin | Updated: January 17, 2017 00:17 IST

तिरंगी लढतीची शक्यता : राष्ट्रवादी आघाडीसाठी प्रयत्नशील; विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू

जयवंत आदाटे ल्ल जतजत तालुक्यातील बिळूर गावात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांचे वास्तव्य असल्याने बिळूर जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपनेही जोरदार तयारी केल्याने कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीसाठी त्यांनी कॉँग्रेस व भाजपसोबत चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे. बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात येतो. येथे मोठ्या प्रमाणात द्विभाषिक मतदार आहेत. पुनर्रचनेत मतदार संघात बदल झाला आहे. पूर्वी या मतदार संघात अकरा गावांचा समावेश होता. त्यातील येळदरी व खोजानवाडी ही दोन गावे कमी करून नऊ गावांचा मतदारसंघ करण्यात आला आहे. बिळूर गटात बिळूर, साळमळगेवाडी, एकुंडी, खिलारवाडी, वज्रवाड, गुगवाड, बसरगी, सिंदूर, उमराणी या नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे. बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या मतदार संघातून महानंदा शिवाप्पा तावशी, कमल जाबगोंड, मंगल आप्पासाहेब नामद या तीन उमेदवारांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये कोणाला लॉटरी लागणार, हे येत्या आठ दिवसात निश्चित होणार आहे.विद्या लक्ष्मण जकगोंड, विमलबाई आप्पासाहेब पाटील, बाळाक्का बसगोंडा जकगोंड, शांताबाई बसगोंडा जकगोंड हे चार उमेदवार काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत.बिळूर पंचायत समिती गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यात पाच गावांचा समावेश आहे. डॉ. राजेश जिवन्नवार (भाजप), अण्णासाहेब गडीकर (भाजप), रामाण्णा जिवन्नवार (भाजप), भैराप्पा मासाळ (कॉँग्रेस), रवींद्र करेन्नवार (राष्ट्रवादी), शिवानंद धोडमाळ (कॉँग्रेस), महादेव धोडमणी (कॉँग्रेस), शिवानंद धोडमणी (राष्ट्रवादी), महातेश गडीकर (कॉँग्रेस), अविनाश गडीकर (कॉँग्रेस) यांची नावे चर्चेत आहेत. उमराणी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यात चार गावांचा समावेश करण्यात आला आहे. महानंदा शिवाप्पा तावशी (भाजप), महानंदा इराप्पा तावशी (भाजप) यांच्यासह श्रीशैल मगदूम (कॉँग्रेस), आप्पासाहेब नामद (भाजप), मल्लेशी कत्ती (कॉँग्रेस), गंगाप्पा मगदूम (राष्ट्रवादी), चंदू पाटील (कॉँग्रेस) यांच्या पत्नींची नावे चर्चेत आहेत.कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी यांचे बिळूर गावातच वास्तव्य असते. आजपर्यंत या मतदार संघावर पी. एम. पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या बिळूर सोसायटीच्या निवडणुकीत पाटील यांना हार पत्करावी लागली आहे. आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत बिळूर गट पाटील यांना तारणार का?, याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीची स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीसाठी त्यांनी कॉँग्रेस व भाजपसोबत चर्चा करण्याची तयारी ठेवली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी जत तालुका दौऱ्यात तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असे समजते.