शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांची घंटा आज वाजणार...

By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST

नव्याची नवलाई : गुलाबपुष्प देऊन होणार स्वागत, शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड

सांगली : नवा वर्ग, नवी पुस्तके, नवा गणवेश अशा अनेक नव्या गोष्टींची नवलाई, उत्सुकता आणि उत्साहाचे उधाण मनात घेऊन चिमुकली पावले सोमवारी शाळांमध्ये दाखल होणार आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून शांत असलेल्या शाळेच्या आवारात पुन्हा सोमवारपासून किलबिलाट सुरू होणार आहे. गेल्या दोन महिन्यांच्या खंडानंतर सोमवारी शाळा सुरु होत आहेत. बालवाडी ते माध्यमिक शाळांचा यामध्ये समावेश असून, मंगळवारपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला रविवारी गणवेश व शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची सांगलीच्या बाजारात झुंबड उडाली होती. दरम्यान, वह्यांच्या किमती यावर्षी दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व बालवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवारपासून सुरु करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून साफसफाई सुरु होती. शाळांच्या फलकावर शनिवारीच शाळांचे वेळापत्रक लावण्यात आले होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी सामूहिकरित्याच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांच्यासह काही अधिकारी काही शाळांना भेटीही देणार आहेत. सोमवारी शाळा सुरु होणार असल्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. हरभट रोड, सराफ कट्टा, कापड पेठ, बालाजी चौक, दत्त-मारुती रस्ता, मित्र मंडळ चौकातील रस्ते गेल्या दोन दिवसांपासून गर्दीने फुलून गेले आहेत. वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, पेन, गणवेश खरेदीसाठी गर्दी झाली होती. कपड्यांच्या दुकानांबरोबरच मित्रमंडळ चौकातील हातगाड्यांवरही शालेय गणवेशासह इतर कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. काही शाळांनी गणवेशासाठी काही दुकानांची नावे पालकांना सुचवली आहेत. त्यामुळे दुकानदारांनी संबंधित शाळांचा गणवेश आमच्याकडे मिळेल, असा फलक लावला आहे. वह्यांच्या किमतीत दहा टक्के वाढ इतर शालेय साहित्याचे दर यंदा स्थिर असले तरी, वह्यांच्या किमती मात्र दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात काही कंपन्यांनी यावर दहा टक्के सूटही जाहीर केल्याची माहिती साहित्य विक्रेते विजय तानवडे यांनी दिली. दोनशे पानी लहान वह्या २०० ते ३०० रुपये डझन आहेत, तर ए फोर साईजच्या वह्या ४०० ते ५०० रुपये डझन आहेत. अनेक कंपन्यांनी यावेळी आकर्षक रंगांच्या वह्या बाजारात आणल्या आहेत.