शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बावडेकर, केळकरांचे नगरसेवकपद रद्द करा

By admin | Updated: September 20, 2016 00:05 IST

याचिका : विभागीय आयुक्तांकडे मागणी

सांगली : महापालिकेतील स्वाभिमानी आघाडीतील संघर्ष उफाळून आला असून, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी, नगरसेवक युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांचे नगरसेवकपद अपात्र ठरवावे यासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या दोन्ही नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असल्याचे याचिकेत म्हटले आहे. स्वाभिमानी आघाडीत शिवसेना, भाजप, मनसे, जनता दल व अपक्ष अशा अकरा नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीनंतर स्वाभिमानी आघाडीला स्वतंत्र गट म्हणून विभागीय आयुक्तांकडे मान्यता मिळाली होती. वर्षभरातच स्वाभिमानी आघाडीची शकले झाली असून या आघाडीतील तीन नगरसेवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आघाडीची सूत्रे शिवसेनेचे गौतम पवार व गटनेते शिवराज बोळाज यांच्याकडे आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वाभिमानीच्या नगरसेवकांत फूट पडली होती. त्यानंतर शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्षही आघाडीत सुरू झाला होता. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भाजपचे युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांनी गटनेते शिवराज बोळाज यांच्याविरूद्ध भूमिका घेतली होती. स्वाभिमानीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्याने या गटाच्या दोन जागा रिक्त ठेवाव्यात, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीला धक्का बसला. अखेर त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. आता संभाजी पवार गटाने, भाजपच्या नगरसेवकांनाच अपात्र ठरवावे, यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. गटनेते शिवराज बोळाज यांनी सोमवारी हा प्रस्ताव दाखल केला. यात युवराज बावडेकर यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी गटनेता व स्थायी समितीतील एक जागा देण्याची मागणी केली होती. बावडेकर यांची मागणी पक्षविरोधी आहे. यासंदर्भात महापालिका अधिनियम, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे दाखले देत, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी बोळाज यांनी केली आहे. तसेच स्वरदा केळकर यांनी स्थायी सदस्य निवडीवेळी गटनेत्यांना आव्हान दिले, गटनेत्यांनी दिलेल्या नावाला आक्षेप घेतला. ही कृतीही पक्षविरोधी असल्याचे बोळाज यांनी याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)नव्वद दिवसांत निर्णययुवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांच्याविरोधात गटनेते बोळाज यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. यासंदर्भात लवकरच विभागीय आयुक्तांकडून दोघांना नोटिसा बजावून त्यांचा खुलासा घेतला जाईल. तसेच महापालिका आयुक्तांकडूनही दोन्ही नगरसेवकांच्या कृतीबाबतचा अहवाल मागविला जाणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांत बोळाज यांच्या अर्जावर विभागीय आयुक्तांना निकाल द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.