शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘वाकुर्डे’चा कालवा फुटला

By admin | Updated: July 24, 2014 23:10 IST

मानकरवाडीतील घटना : दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले

शिराळा : मानकरवाडी (ता. शिराळा) येथे वाकुर्डे योजनेचा कालवा फुटून पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने पन्नास एकर जमीन वाहून गेली. अचानक पाणी आल्याने शेतात काम करणाऱ्या सुमारे दहाजणांचे प्राण प्रसंगावधानामुळे बचावले. हा प्रकार काल (बुधवारी) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला. वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचा एक कालवा वाकुर्डेकडून शिरसीकडे डोंगरास वळसा घालून जातो. तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे या कालव्यातून तसेच डोंगरावरून प्रचंड वेगाने पाणी वहात या कालव्यात आल्याने मानकरवाडी गावाजवळील कालव्यास भगदाड पडले. या कालव्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडले. बबन नांगरे, मंगेश चव्हाण या युवकांनी पोती टाकून सुरूवातीस भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जोरदार असल्याने हे युवक कसेबसे जीव वाचवून बाजूला झाले. शेतात काम करणारे शेतकरीही आरडाओरडा करीत बाजूला झाले. या भगदाड पडलेल्या कालव्यापासून सुमारे एक किलोमीटरवर अंत्री-मानकरवाडी मध्यम प्रकल्प आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची शेती पाण्याने वाहून गेली, तर काहींच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. यादरम्यान असणाऱ्या रस्त्याचेही नुकसान झाले. कालव्यापासून रस्त्यापर्यंत असणारी जवळजवळ पन्नास एकर क्षेत्रातील माती, पिके, बांध वाहून गेले. बबन आनंदा नांगरे (आठ एकर), गजानन म्होप्रेकर, नंदाताई सुरेंद्र चव्हाण, मंगेश सुरेंद्र चव्हाण, जितेंद्र चव्हाण, मीरा चव्हाण, (सर्व रा. मानकरवाडी) यांची प्रत्येकी दोन एकर, शामराव जाधव, मारुती जाधव, संजय जाधव, (सर्व रा. आंबेवाडी), सुनील पाटील (रा. शिरशी), एकनाथ धुमाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या शेतीची पूर्ण माती वाहून गेली. सुभाष म्होप्रेकर यांचे जवळजवळ ७० बाय ६० फूट आकाराचे तळेच या मातीने व पाण्याने भरले गेले. या पाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या फुटलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे अंत्री-करमजाई धरण अवघ्या चार तासात भरले व धरणाच्या सांडव्यातून पाणीही बाहेर पडले. (वार्ताहर)