शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णालयांच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

सांगली : महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालये, केअऱ सेंटरमधील ऑक्सिजन प्लॅन्ट व त्यांच्या वितरण व्यवस्थेचे ऑडिट करण्यात येत आहे. तसेच ...

सांगली : महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालये, केअऱ सेंटरमधील ऑक्सिजन प्लॅन्ट व त्यांच्या वितरण व्यवस्थेचे ऑडिट करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन गळती, आगीसारख्या घटना टाळण्यासाठी फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिटही केले जात असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीने बुधवारी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल आयुक्तांनी घेतली. ते म्हणाले की, ऑक्सिजन प्लॅन्टला गळती लागू नये, प्लॅन्ट ते रुग्णालयातील बेडपर्यंतची वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, रुग्णांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, त्यात बिघाड होऊन रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी कोविड रुग्णालये, केअऱ सेंटर आणि हेल्थ सेंटरचे ऑडिट करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्याशिवाय फायर, इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडिटचे कामही हाती घेतले आहे. जिल्ह्यात कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन संपला आणि ऑक्सिजनअभावी रुग्णाचे हाल झाले, असा एकही प्रकार घडलेला नाही. रेमडेसिविर उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी व प्रशासन यांच्यात चांगला समन्वय असल्याचेही ते म्हणाले.

चौकट

कुंभमेळ्यातून आलेल्यांची अँटिजेन चाचणी

महापालिका हद्दीत कुंभमेळ्यातून १४ ते १६ भाविक आले आहेत. त्यांची यादी रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे दिली आहे. या भाविकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करून त्यांना घरीच विलगीकरण केले जाईल. त्यानंतर लक्षणे असतील तर आरटीपीसीआर चाचणीही करणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.

चौकट

‘बेल्लारी’तून होणार ऑक्सिजन पुरवठा

कर्नाटकातील बेल्‍लारी येथून जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तेथील स्टील प्लॅन्टमधून ऑक्सिजन येत आहे. केंद्र, राज्य शासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असा विश्‍वासही कापडणीस यांनी व्यक्त केला.