शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा आज लिलाव

By admin | Updated: October 26, 2016 00:19 IST

५२ कोटींची थकबाकी : प्रशासनाची तयारी

मिरज : सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ५२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी बुधवारी मिरज तहसील कार्यालयात कारखाना मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची देणी देण्यात येत असल्याने जप्ती वसुली प्रक्रिया थांबविण्याची कारखाना प्रशासनाची मागणी तहसीलदारांनी फेटाळली आहे.वसंतदादा कारखान्याकडून २0१३-१३ च्या ऊस बिलाचे ३९ कोटी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत शेतकरी संघटनेच्या तक्रारीमुळे साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून थकबाकी वसुलीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन वर्षापूर्वी महसूल विभागाने तहसीलदारांमार्फत थकबाकी वसुली प्रक्रिया सुरू करून तीन नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात आला आहे. थकबाकीची रक्कम ५२ कोटीवर पोहोचली आहे. मात्र कारखान्याने सर्व देणी दिली नसल्याने तहसीलदार शरद पाटील यांनी १५ आॅक्टोबर रोजी कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाची अंतिम नोटीस बजावली आहे. कारखाना व्यवस्थापनाने थकबाकीपैकी सुमारे ४0 कोटी देणी दिली असल्याने मालमत्तेचा लिलाव थांबविण्याची मागणी केली. मात्र थकबाकीची संपूर्ण रक्कम वसूल होण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. बुधवारी मिरज तहसील कार्यालयात कारखान्याची इमारत वगळता अन्य मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. मालमत्तेची लिलावात विक्री न झाल्यास मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)