शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घ्यावे...

By admin | Updated: January 2, 2015 00:19 IST

एम. आर. यादव : अन्यथा वेतन रोखणार, शाळांना इशारा

सांगली : समायोजन केलेल्या अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित शाळांचे वेतन रोखणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. आर. यादव यांनी दिली. यामुळे आता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास उत्सुक नसलेल्या शाळांना तातडीने त्यांचे समायोजन करावे लागणार आहे.माध्यमिक शाळांमध्ये ८२४ शिक्षण अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ७२४ शिक्षकांचे संस्थाअंतर्गत समायोजन करण्यात आले आहे. उर्वरित अतिरिक्त १०१ पैकी पदवीधर ५६ शिक्षकांचे पदवीधर शिक्षकपदावर समायोजन केले आहे, तर उर्वरित ४५ पैकी बी. एड्. वेतन श्रेणीतील २७ शिक्षकांचे अन्य शिक्षण संस्थांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. डी. एड्. वेतनश्रेणीतील १८ शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नाही. ज्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले आहे, त्यापैकी काही शाळांनी समायोजित शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करतील, त्या शाळांचे जानेवारीचे वेतन रोखणार असल्याचेही यादव यांनी सांगितले. शाळांचा मातृवंदनेने प्रारंभभारतीय संस्कृती जतन करण्यासाठी नववर्षारंभाच्या पहिल्या दिवशी आज जिल्ह्यातील बहुतांश सर्व शाळांमध्ये मातृवंदना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मातेचा योग्य सन्मान राखावा, याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळावी, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, उपसंचालक मारुती गोंधळी यांनी, हा उपक्रम सर्व शाळांनी राबवावा, या आशयाचे परिपत्रक काढले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १७१० शाळा असून त्यामध्ये १ लाख ३६ हजार १२५ विद्यार्थी शिकत आहेत. यापैकी बहुतांशी शाळांमध्ये आज मातृवंदनेनेच शाळेचा प्रारंभ करण्यात आला. दि. ३ जानेवारी रोजी बालिका दिन असल्याने काही शाळांमध्ये या दिवसापर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना शाळेत येताना आईला वंदन करुन यावे, घरकामात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. शाळांमध्ये मातांना बोलावून त्यांचा सत्कार, मातृभक्ती या विषयावर कथाकथन, ‘आई’ या विषयावर निबंध हे उपक्रम करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुन्ने यांनी दिली.