शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नागरी प्रश्नांसाठी महापालिकेवर हल्लाबोल

By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST

मोर्चाद्वारे निषेध : काँग्रेस व नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखविण्याची मागणी

सांगली : गुंठेवारी, रस्ते, गटारी, खड्डे, आरोग्य सुविधांसह विविध प्रश्नांवर आज, सोमवारी शहर राष्ट्रवादीच्यावतीने भर पावसात महापालिकेवर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध केला. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नेते व नगरसेवकांना सत्तेची धुंदी चढली असून, त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशाराही देण्यात आला. नागरी समस्या सोडविण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटमही देण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी सभापती युवराज गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक संजय बजाज, नगरसेवक राजू गवळी, बाळू सावंत, विष्णू माने, इब्राहीम चौधरी, जुबेर चौधरी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपायुक्त सुनील नाईक यांना निवेदन देण्यात आले. मोर्चासमोर बोलताना दिनकर पाटील म्हणाले की, काँग्रेसला काम करण्यासाठी एक वर्षाची संधी दिली. पण वर्षभरात एक टक्काही काम झालेले नाही. शहराला गढूळ व मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. महाआघाडीच्या काळात ७० कोटींचा निधी आणून पाण्याची योजना सक्षम केली. वारणेचा वाढीव प्रस्ताव दिला होता. शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत, तर सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर डांबरी रस्ते होतात. सरसकट दोन हजार पाणीपट्टी लागू करण्यासही आमचा विरोध आहे. नवा जिझिया कर लादण्याचा डाव हाणून पाडू. रस्ते, आरोग्य, स्वच्छता या सुविधाही पालिका देऊ शकलेली नाही. गुंठेवारीत नागरिकांची दैना उडाली आहे. गुंठेवारी कायद्याचा दुरुपयोग सुरू आहे. एलबीटीवरून व्यापाऱ्यांवर फौजदारी केली जात आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेचे अंदाजपत्रकही फुगविले आहे. सत्ताधारी काँग्रेसला सत्तेची धुंदी चढल्याचा आरोपही केला. मोर्च्यात नगरसेविका संगीता हारगे, स्नेहल सावंत, अनिल पाटील- सावर्डेकर, अभिजित हारगे, राहुल पवार, मनोज भिसे, वैभव गिड्डे, योगेंद्र थोरात, राजू माळी, ओंकार मनवे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)