शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

वातावरण ढगाळ, द्राक्षोत्पादक घायाळ

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

मिरज पूर्वमधील चित्र : रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

प्रवीण जगताप - लिंगनूर -मिरज पूर्व भागास पुन्हा एकदा ढगाळ हवामानाने घेरले आहे. बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून ढगाळ वातावरण होण्यास प्रारंभ झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे सर्वच द्राक्षबागांना फटका बसू लागला आहे. आज दिवसभरात अनेक गावांत तुरळक पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत. त्यामुळे ‘वातावरण ढगाळ आणि द्राक्षोत्पादक घायाळ’ असे चित्र निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा काल रात्री बारापासून वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. आज (गुरुवारी) सकाळी लिंगनूर, संतोषवाडी, जानराववाडी यासह पूर्व भागातील अनेक गावांत सकाळी नऊच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी पडल्या. हा पाऊस अन्य पिकांना फारसा परिणामकारक नसला तरी, द्राक्षोत्पादक मात्र घायाळ झाले आहेत. याबाबत काही द्राक्षोत्पादकांशी सांगितले की, मागील आठवड्यापूर्वी पावसाने संततधार लावली होती. त्यामुळेही काही द्राक्षबागांना दावण्याचा झटका बसला होता, तर पूर्व भागात आॅगस्ट छाटणी घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या या आॅगस्ट छाटणीच्या बागात द्राक्षघडांची निर्मिती झाली आहे, तर काही द्राक्षबागा फ्लॉवरिंग व पोंगा स्टेजमध्ये आहेत. या सर्वच स्टेजमधील बागांना दावण्या, करपा, भुरी यासारख्या रोगांचा फटका बसू लागला आहे. त्यामुळेच बागांवर महागड्या औषध फवारणीचा सपाटा सुरू झाला आहे. घडांवर व डोळ्याच्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. काही द्राक्षोत्पादकांनी आजचाच मुहूर्त छाटणीसाठी निवडला होता. मात्र या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे त्यांनी छाटण्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी छाटणीवेळी काड्यांना लावलेली पेस्ट या पावसाने धुऊन त्याचा फुटण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले. काही द्राक्षोत्पादकांनी बेदाणा निर्मितीसाठी असलेल्या बागांची आॅक्टोबर छाटणी घेण्याचे ठरविले आहे. त्या द्राक्षबागांनाही या पावसाची तीव्रता वाढल्यास छाटणी न झालेल्या काडीवरचे डोळे छाटणी न करताच फुटण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. असे छाटणीआधी फुटलेले व औषधाअभावी वाढणारे घड रोगांना बळी पडतात, त्यांचे उत्पन्न येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वच स्टेजमधील द्राक्षोत्पादकांना ढगाळ हवामानाने चिंताक्रांत करून सोडले आहे. नजरा इंटरनेटवर खिळल्या...बुधवारी रात्रीपासून बदललेले ढगाळ हवामान आणखी किती दिवस आहे. पावसाचे प्रमाण कसे आहे, याचा इंटरनेटवरील हवामान अंदाजाच्या साईट्सवरून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार औषधांचे नियोजन व निवड करून आपापल्या बागा वाचविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.